जामखेड मध्ये ७५ मीटर तिरंगा यात्रा रॅलीने हर घर तिरंगा अभियानची भव्य सुरुवात. जिल्ह्यातील सर्वात मोठी ७५ मीटर तिरंगा यात्रा

0
588

जामखेड न्युज——

जामखेड मध्ये ७५ मीटर तिरंगा यात्रा रॅलीने हर घर तिरंगा अभियानची भव्य सुरुवात.

जिल्ह्यातील सर्वात मोठी ७५ मीटर तिरंगा यात्रा

 

जामखेड तहसील अंतर्गत ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट हर घर तिरंगा अभियानाची सुरुवात जामखेड मध्ये भव्य ७५ मी तिरंगा यात्रा रॅली काढण्यात आली. यावेळेस सतरा महाराष्ट्र बटालीयनचे एनसीसी कॅडेट यांनी ७५मीटर तिरंगा धरून जामखेड मध्ये भव्य तिरंगा यात्रा काढली.


या भव्य ७५ मिटर तिरंगा यात्रा रॅलीचे उद्घाटन जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांनी केले तर प्रमुख उपस्थिती जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे, पोलीस निरीक्षक महेश पाटील, नायब तहसीलदार मनोज भोसेकर, निवडणूक नायब तहसीलदार संजय काळे, महसूल नायब तहसीलदार विजय इंगळे, मंडल अधिकारी प्रशांत माने, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, शिवनेरीची संचालक कॅप्टन लक्ष्मण भोरे,
प्राचार्य श्रीकांत होशिंग ,प्राचार्य एम एल डोंगरे, प्राचार्य मडके बी के , एनसीसीचे कॅप्टन गौतम केळकर, सेकंड ऑफिसर अनिल देडे, थर्ड ऑफिसर मयूर भोसले ,तलाठी विश्वजीत चौगुले,मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे, शिक्षक वृंद, आजी-माजी सैनिक, ग्रामस्थ, एनसीसी कॅडेट विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


तसेच जामखेड महाविद्यालय, ल ना होशिंग विद्यालय व रयतचे श्री नागेश विद्यालयाचे एनसीसी कॅडेट यांनी तिरंगा यात्रेत उस्फुर्त सहभाग घेतला. जामखेड तहसील कार्यालय, नगर परिषद, पोलीस विभाग, पत्रकार, शासकीय निम शासकीय कर्मचारी यामध्ये सहभाग घेतला.

या रॅलीचा मार्ग – तहसील कार्यालय- खर्डा चौक- तपनेश्वर रोड -ढवळे किराणा कॉर्नर – श्री नागेश विद्यालय मागे -आदित्य मंगल कार्यालय कॉर्नर -बीड रोड- बीड कॉर्नर -तहसील कार्यालय या मार्गाने काढण्यात आली.हर घर तिरंगा, भारत माता की जय ,जय जवान जय किसान, ह्या घोषणेने जामखेड परिसर दुमदुमून निघाला. यावेळी ठिकठिकाणी ग्रामस्थांनी तिरंगा ध्वजास मानवंदना दिली.

यावेळी तहसीलदार गणेश माळी यांनी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे ७५ मी तिरंगा यात्रा रॅली जामखेड मध्ये सुरुवात झाली ही अभिमानाची बाब आहे. हर तिरंगा अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले यामध्ये नऊ ते पंधरा ऑगस्ट दरम्यान तिरंगा यात्रा, तिरंगा रॅली, मोटरसायकल व सायकल रॅली ,देशभक्ती सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा कॅनव्हास व प्रतिज्ञा, तिरंगा विथ सेल्फी, स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान, व देशभक्तीपर कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीत घेण्यात येणार आहे अशी माहिती दिली. सर्व नागरिकांनी या उपक्रमांनी उत्स्फूर्त भाग घेऊन १३ ते १५ ऑगस्ट रोजी प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावावा असे आवाहन केले.

तसेच 17 महाराष्ट्र बटालियनचे जामखेड एनसीसी कॅडेट यांनी तिरंगा रॅली यशस्वी करून दाखवली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. शहीद जवान गणेश भोसले प्रतिष्ठानच्यावतीने तिरंगा 75 मी तिरंगा देण्यात आला .
कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here