जामखेड न्युज ——–
जयराम झेंडे सावित्रीबाई फुले विद्यापीठाची सेट परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण
स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने सत्कार
घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असताना जिद्द चिकाटी व मेहनतीच्या बळावर जयराम अर्जुन झेंडे याने सावित्रीबाई फुले विद्यापीठाने घेतलेल्या सेट परिक्षेत मराठी विषयात पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाला असून त्यामुळे परिसरातील लोक अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन जयरामने प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा मोहा दहावी पर्यंतचे शिक्षण प्रदीप बांगर विद्यालय मोहा व अकरावी बारावी चे शिक्षण ल.ना. होशिंग विद्यालय जामखेड येथे शिक्षण घेतले आहे. जयराम ने पदवी व पदव्युत्तर शिक्षण जामखेड महाविद्यालय जामखेड येथून पूर्ण केले आहे.
सोबतच तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असून उत्तम अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न आहे.
सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी ने घेतलेल्या सेट परिक्षेत मराठी विषयात पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाला असून त्यामुळे परिसरातील लोक अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
नुकताच स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र जामखेड येथे त्याचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले.
यावेळी स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक प्रा.सोमनाथ शिंदे सर,शिंदे बी.एस.सर, विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.