जामखेड न्युज——
ज्ञानराधा मल्टिस्टेट संस्थेतील ठेवी मिळाव्यात तसेच इतर मागण्यासाठी अँड. हभप महारुद्र नागरगोजे यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस
ज्ञानराधा मल्टीस्टेट संस्थेचे अध्यक्ष व सर्व संचालक मंडळ यांच्या सर्व मालमत्ता जप्त करून तात्काळ ठेवीदारांच्या ठेवी परत द्याव्यात, भ्रष्ट आमदार, खासदार, मोठे अधिकारी यांची बेहिशेबी मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांना कृषी पंप द्यावे यासह विविध मागण्यांसाठी हभप अँड. महारुद्र नागरगोजे यांनी जामखेड तहसील कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण सुरू केले आहे.
नाही जातीसाठी लढा मातीसाठी गरीबांच्या हक्कासाठी असे घोषवाक्य घेऊन हभप अँड. महारुद्र ना गरगोजे जामखेड तहसील कार्यालया समोर सोमवारी विविध मागण्यांसाठी सकाळी अकरा वाजता उपोषण सुरू केले आहे. त्यानी प्रभारी तहसीलदार मनोज भोसेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निवडणूक निकालानंतर बुथ व गावनिहाय मतदान घोषित करणे बंद करा, जिरायत खडकाळ 15 एकर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना अल्पभूधारक घोषित करा, गरीबांना राहण्यासाठी घरे जागा द्या, भुमिहीन लोकांना सरकारी जमीन देताना वर्ग १ करून मिळावा, गरीबांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळावे, ज्यादा पगार असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा पगार कमी करून कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगार वाढवून द्यावा तसेच ज्ञानराधा मल्टीस्टेट संस्थेच्या पदाधिकारी व संचालकाचा मालमत्ता जप्त करून ठेवीदारांना ठेवी मिळाव्यात अशा विविध मागण्यांसाठी हभप महारुद्र नागरगोजे उपोषणाला बसले आहे. प्रभारी तहसीलदार मनोज भोसेकर यांनी उपोषणस्थळी भेट दिली व मागण्या बाबत चर्चा केली.
सदर उपोषणा कर्त्यांसमवेत प्रवीण राळेभात, उदयकुमार दाहितोडे, डॉ. प्रदीप कात्रजकर, राऊत वकील, संतोष शिंदे, अरुण चव्हाण, मोहन चव्हाण, मधुकर पवार, महेश भोसले इत्यादी उपस्थित होते.
ज्ञानराधाचे ठेवीदार तीन ते चार हजार जामखेड तालुक्यातील असताना सुद्धा आणि जामखेड तालुक्यात दोन आमदार असून या ठेवीदारांच्या प्रश्नाबाबत एकाही आमदाराने ठेविदारांची साधी विचारपूस सुद्धा केलेली नाही त्यामुळे सर्व ठेवीदार या दोन्ही आमदारांवर नाराज झालेले आहेत या आमदारांनी जनतेला वाऱ्यावर सोडलेले आहे. अशी भावना सर्वसामान्य ठेवीदारांमध्ये आहे.
चौकट
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर मोलमजुरी करण्याची वेळ
मुलांमुलींच्या उच्च शिक्षणासाठी तसेच लग्नासाठी विश्वासाने अनेकांनी सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा पतसंस्थेत आपल्या आयुष्याची पुंजी ठेवली, स्वतः च्या पोटाला चिमटा घेऊन, मोलमजुरी करून, सेवानिवृत्ती नंतर उर्वरित आयुष्य व्याजाच्या पैशावर गुजरान करावी म्हणून जामखेड परिसरातील ठेवीदारांनी ज्ञानराधा को – आँप क्रेडीट सोसायटी जामखेड शाखेत जामखेड व परिसरातील ६५०० ठेवीदारांचे ९० कोटी रुपये रूपये ठेव आहेत. त्या लवकरात लवकर मिळाव्यात अशी मागणी आहे.