जामखेड न्युज——
सात तासातच मोटारसायकल चोरीचा जामखेड पोलीसांनी लावला छडा
मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने पोलीसांचा सत्कार
जामखेड येथील खर्डा चौकातून दोन दिवसांपूर्वी मोटारसायकल चोरीची फिर्याद जामखेड पोलीस स्टेशनला दाखल झाली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोराचे ठिकाण शोधून अवघ्या सात तासात मोटारसायकल चोराला अटक केली यामुळे जामखेड पोलीसांच्या कर्तव्य तत्पर कामगिरी बद्दल मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने पोलीसांचा सत्कार करण्यात आला.
जामखेड येथील खर्डा चौकातील मक्का मस्जिद समोरून कोणीतरी अज्ञात चोरट्याने आपली मोटारसायकल चोरून नेल्याची फिर्याद दाखल केल्यानंतर जामखेड पोलीसांनी सिसिटीव्ही फुटेज व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकव्दारे चोराची माहिती व ठिकाणा निष्पन्न करत जालना जिल्ह्य़ातील घनसावंगी तालुक्यातील एकलहरे येथुन रात्री ४: ०० वाजताच्या सुमारास मोठ्या शिताफीने चोरट्याच्या मुसक्या आवळून जामखेड पोलीस स्टेशनला आणत अटक केली आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासात चोरीचा तपास करून आरोपीस अटक केल्याबद्दल जामखेड पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
त्यानुसार जामखेड पोलिसांनी उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने पोलीस निरीक्षक महेश पाटील, सदर पोलीस पथकातील पोलीस हेडकॉन्टेबल प्रवीण इंगळे, पोलीस नाईक संतोष कोपनर,पोलीस काॅन्स्टेबल देविदास पळसे, कुलदीप घोळवे व वाहतूक शाखेचे पोलीस काॅन्स्टेबल दिनेश गंगे,
यांचा मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष अझहर भाई काझी, नगरसेवक अर्शद शेख, इस्माईल सय्यद, मुख्तार सय्यद, इम्रान कुरेशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी चोरीस गेलेल्या मोटरसायकलचे मालक कलीम मकसुद मुल्ला (खलीफा) रा. बार्शी हे उपस्थित होते.