जामखेड न्युज——
श्री संत सावता महाराज चरित्र कथन व अखंड हरिनाम सप्ताहाला सुरवात

श्री संत शिरोमणी सावता महाराज समाधी सोहळ्यानिमित्त जामखेड येथील विठ्ठल मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह व सावता महाराज चरित्र कथन सोहळ्यास रवीवारी सुरवात झाली. रविवारी चार वाजता हभप सदाशिव महाराज शिंगटे यांनी प्रवचन केले तर हभप मनोहर महाराज इनामदार सर यांचे किर्तन रात्री सात ते नऊ या वेळेत झाले. या सप्ताह सोहळ्यात प्रवचन, किर्तन तसेच भव्य दिंडी मिरवणूक होणार आहे.

श्री संत सावता महाराज सेवा मंडळ मागील ७० वर्षापासून श्री संत सावता महाराज समाधी सोहळ्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व सावता महाराज चरित्र कथन सोहळा अयोजीत करतात.

या सप्ताह सोहळ्यात दैनंदिन कार्यक्रमात पहाटे ४ ते ६ काकडा भजन, ६.३० ते ७.३० श्री विठ्ठल रूक्मिणी महापूजा, विष्णु सहस्त्रनाम प्रार्थना,सकाळी ९ ते ११ गाथा भजन, दुपारी २ ते महीला भजनी मंडळ, ४.३० ते ५.३० सावता महाराज चरित्र, सायंकाळी ५.३० ते ६.३० हरीपाठ, ७ ते ९ हरीकिर्तन व नंतर हरीजागर असे कार्यक्रम असतात.

अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यात दि. २८ रोजी हभप मनोहर इनामदार यांचे किर्तन झाले, २९ रोजी मंचर येथील किर्तनकार हभप डॉ. ज्ञानेश्वर माऊली थोरात, दि. ३० रोजी हभप गोविंद महाराज जाटदेवळेकर (पाथर्डी), ३१ रोजी हभप विजय महाराज बागडे (जामखेड), दि.१ आँगस्ट रोजी हभप दत्तात्रय महाराज हुके, दि.२ रोजी हभप रोहीदास महाराज शास्त्री (राजे धर्मगड), दि. ३ रोजी हभप नामदेव महाराज विधाते (नांदूर) यांचे किर्तन होणार आहे.

तर रवीवारी ४ रोजी नामदेव शास्त्री विधाते यांचे काल्याचे किर्तन होणार आहे व यानंतर महाप्रसाद होऊन सप्ताहाची सांगता होणार आहे.





