जामखेड न्युज——
मनू भाकरने रचला इतिहास, ऑलिम्पिक नेमबाजीत भारताला जिंकून दिल कांस्यपदक

जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट भेटल्याशिवाय राहत नाही. हे भारताच्या 22 वर्षीय मनु भाकर हिने सिद्ध करून दाखवलं आहे. मागील ऑलिम्पिकमध्ये पिस्तुलमध्ये बिघाड झाला होता मात्र यंदा पूर्ण तयारीने तिने भारताला पदकांचं खातं उघडून दिलं आहे. पॅरिसमध्ये ऑलिम्पिकची स्पर्धा सुरु असून यात मनू भाकरने भारताला यंदाच्या ऑलिम्पिकच पहिलं वहील पदक जिंकून दिल आहे.

मनू भाकरने महिला नेमबाजीत कांस्य पदकाची कमाई केली असून तिने 10 मीटर एअर पिस्तुलच्या अंतिम सामन्यात 221.7 पॉइंट्ससह हे पदक मिळवलं आहे. मनू ही ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात पदक जिंकणारी पहिली महिला भारतीय नेमबाज ठरली आहे.

अवघ्या 22 व्या वर्षी मनू भाकर हिने हे यश मिळवलं असून तीच सर्व स्थरातून कौतुक केलं जात आहे. मनूला रौप्य पदक मिळवण्याची संधी थोडक्यात हुकली. 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात कोरियाच्या ओह ये जिन हीने सुवर्ण पदक मिळवलं. तर कोरियाच्या की ही किम येजी हीने रौप्य पदक पटकावलं. पहिल्या आणि दुसऱ्या स्थानासाठी जोरदार चुरस पाहायला मिळाळी. कोरियाच्या या दोघींनी अुनुक्रमे 243.2 आणि 241.3 असा स्कोअर केला. दोघींच्या पॉइंट्समध्ये फक्त 2 चा फरक होता. तर मनूने 221.7 पॉइंट्ससह कांस्य पदकाला गवसणी घातली.

भारताने उघडलं खातं; मनु भाकरने घडवला इतिहास, कांस्य पदकावर कोरलं नाव
2020 च्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये मनु भाकरने पदार्पण केले होतं. मात्र तेव्हा मनु अपयशी ठरली होती. मनुला तेव्हा 12 व्या स्थानी समाधान मानावं लागल्याने तिचं आव्हान संपुष्टात आलं. यावेळी तिच्या पिस्तुलात बिघाड झाला होता ज्यामुळे तिला केवळ 14 शॉट मारता आले. मात्र मनूने २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जोरदार कमबॅक करून भारतासाठी पदकाची कमाई केली आहे.

ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत 2004 मध्ये राज्यवर्धन राठोडने रौप्य, 2008 मध्ये अभिनव बिंद्राने सुवर्ण तर 2012 मध्ये गगन नारंग आणि विजय कुमारने सिलव्हर मेडल मिळवलं होतं. तर आता मनू भाकरने अनेक वर्षांचा दुष्काळ दूर करून नेमबाजीत मेडल मिळवलं आहे.

मनू भाकर कोण आहे?
हरियाणामधी झज्जर येथे मनू भाकर हिचा जन्म झालाय. शाळेत असल्यापासूनच तिला खेळाची आवड होती. शाळेमध्ये मनू टेनिस, स्केटिंग आणि बॉक्सिंगसारख्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायची. यामध्ये तिने ‘थान टा’ नावाच्या मार्शल आर्टमध्ये राष्ट्रीय स्तरावर पदके जिंकली होतीत. मात्र बॉक्सिंगमध्ये तिच्या डोळ्याला दुखापत झाली आणि तिचा बॉक्सिंगमधील प्रवास संपला होता. पण खेळापासून ती स्वत:ला जास्त दूर ठेवू शकत नव्हती. वयाच्या 14 व्या वर्षी मनू हिन नेमबाजीमध्ये आपले करियर करण्याचा निर्णय घेतला. वडिलांना पिस्तुल खरेदी करण्यास सांगितले. त्यानंतर मुलीच्य स्वप्नांना पाठिंबा देणाऱ्या तिच्या वडिलांनी पिस्तुल विकत घेऊन दिली होती, आज त्याच मनू भाकरने भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकांचं खातं उघडलं आहे.









