जामखेड तालुक्यात अतिवृष्टीने शेतात तळे, पीके पाण्यात पिकांचे पंचनामे करण्याची मागणी

0
542

जामखेड न्युज——

जामखेड तालुक्यात अतिवृष्टीने शेतात तळे, पीके पाण्यात

पिकांचे पंचनामे करण्याची मागणी

 

जामखेड तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून सारखाच लहान मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. शेताचे तर तळेच झाले आहे. तालुक्यातील अनेक गावात अतिवृष्टीने शेतात तळे साचले आहे. परिसरातील पीके पाण्यात गेले आहेत. पाण्यात पीके असल्याने सडू लागली आहेत. मोठ्या प्रमाणावर खर्च करून खते, बियाणे मेहणत करून खर्च केला पण सध्या पीके पाण्यात असल्याने सडू लागली आहेत. ताबडतोब पंचनामे करावेत अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

तलाव भरले मात्र पीके पाण्यात
परिसरात अनेक दिवसांपासून सततच्या पावसामुळे तलाव भरले आहेत मात्र पीके पाण्यात असल्याने सडू लागली आहेत. अनेक दिवसांपासून सूर्यदर्शन होत नाही. शेतात पाणी आहे. यामुळे ताबडतोब पंचनामे करण्याची मागणी होत आहे. एका महिन्यांपासून सततच्या पावसामुळे पीके पाण्यात असल्याने सडू लागली आहेत.

यावर्षी अनेक वर्षानंतर जुन महिन्यातील मृग नक्षत्रात पेरणी झाली होती. बळीराजाने महागडे खते, बियाणे वापरून पेरणी केली सुरवातीपासूनच रिमझिम पाऊस होता उन्ह मात्र नव्हते. यामुळे पीकांची वाढ चांगली झाली नाही. आणि आतातर अनेक ठिकाणचे पीकेच पाण्यात गेलेली आहेत. यामुळे बळीराजा चिंतेत आहे. पीके सडू लागली आहेत. पंचनामे करावेत अशी मागणी होत आहे.

परिसरातील सर्व धरणे तलाव भरले आहेत नदी ओढे खळखळून वाहत आहेत. अनेक ठिकाणी तर मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पीके पाण्यात असून सडायला लागली आहेत. तेव्हा ताबडतोब पंचनामे करावेत अशी मागणी होत आहे.

शेतकऱ्यांची पीके पाण्याखाली गेले आहेत. पीके कोवळी असल्याने सडून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. साकत, खर्डा, मोहरी, दिघोळ, सावरगाव, मोहा,जातेगाव, जामखेड, फक्राबाद, धानोरा, पिंपळगाव आळवा, उंडा यासह परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने परीसरातील नद्यांना, ओढ्यांना पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या अनेक दिवसात जुलै महिन्यातच प्रथमच अनेक तलाव भरले आहेत तर नद्या. ओढ्यांना पूर आला आहे. सोयाबीन, उडीद, मुग, तुर ही पीके पाण्याखाली गेले आहेत. पंचनामे करावेत अशी मागणी होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here