ॲड डॉ. अरुण जाधव यांना कै. तात्यासाहेब देशमुख पुरस्कार जाहीर

0
393

जामखेड न्युज——

ॲड डॉ. अरुण जाधव यांना कै. तात्यासाहेब देशमुख पुरस्कार जाहीर

 

कै. ल.रा. देशमुख तथा तात्यासाहेब देशमुख यांचा २८ वा स्मृतिदिन २७ जुलै २०२४ रोजी पुणे येथे आहे. तात्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचे कुटुंबीय दरवर्षी जामखेड तालुक्यातील किंवा जामखेड गावातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ज्याने स्वतःच करिअर उत्तम केलेलं आहे आणि आज प्रामाणिकपणे निष्ठेने काम करीत आहे अशा व्यक्तीचा गुणगौरव केला जातो यावर्षी ॲड डॉ अरुण जाधव हे जामखेड मधील तरुण युवा व्यक्तिमत्व आहे.


ॲड डॉ अरुण जाधव यांनी आजपर्यंत वंचित समाज, अप्रगत विद्यार्थी, कमी उत्पन्न असलेले लोक विविध क्षेत्रातील मजूर यांची सामाजिक आर्थिक बौद्धिक नैतिक गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रचंड प्रयत्न केलेले आहेत. त्यांच्या कार्याला यशही मिळत आहे. त्यांची पध्दती पाहून हे कार्य त्यांचं अधिक जोमाने वाढावे म्हणून या पुरस्कारासाठी अरुण जाधव यांची निवड केलेली आहे.

 

तात्यासाहेब देशमुख हे जामखेडचे रहिवासी होते आणि त्यांचे परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती त्यामुळे या पुरस्काराला जामखेड तालुक्यामध्ये विशेष महत्त्व आहे यावर्षीचा हा पुरस्कार प्रसिद्ध कवी आणि गझलकार श्री हिमांशू कुलकर्णी यांच्या हस्ते पुणे येथे २७ जुलै रोजी दिला जाणार आहे.


या कार्यक्रमासाठी दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्षअरुण चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, खजिनदार राजाभाऊ मोरे, तसेच ॲड अरुण जाधव यांचे काही सहाध्यायी, सहयोगी उपस्थित राहणार आहेत जामखेडचे पुणे येथील रहिवासी या कार्यक्रमाला दरवर्षी आवर्जून येतात अशी माहिती जी. एल.देशमुख व डॉ. अ. ल. देशमुख, पुणे यांनी दिली आहे.


अरुण जाधव यांचा जन्म भटक्या विमुक्त कुटुंबात झाला. त्यामुळे बालपणापासून त्यांनी वंचितच जीनं काय असते हे अनुभवले. समाजात वावरत असताना जेव्हा काही अनाथ, निराधार, गोरगरीब, ऊसतोडणी कामगार, वीटभट्टी कामगार, घिसाडी, वडारी, कैकाडी, वासुदेव, पिंगळा, मदारी, भिल्ल, पारधी आदी वंचित कुटुंबातील मुले शिक्षण न घेता रस्त्यावर किंवा दारोदार भीक मागताना पहायचे. तेव्हा या मुलांसाठी आपण काहीतरी करावे असे जाधव याना नेहमी वाटायचे. जाधव यांनी उच्च शिक्षण घेतल्यानंतरही कुठे नोकरी न करता पूर्णवेळ स्वत:ला सामाजिक कार्यात वाहून घेतले. त्यानी ‘ग्रामीण विकास केंद्र’ या संस्थेची स्थापना करत दलित, आदिवासी, भटके-विमुक्त माझ्यातील निराधार महिला व मुलांसाठी काम सुरू केले. आज शेकडो मुले इथे राहुन शिक्षण घेत आहेत.

अँड डॉ. अरूण जाधव यांना आतापर्यंत अनेक सामाजिक तसेच शासकीय पुरस्कार मिळाले आहेत. गंगाबाई बाबाजी आदर्श सामाजिक पुरस्कार तसेच महाराष्ट्र शासनाचा लोकशाही मित्र पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच त्यांनी दीन दलित वंचित समाजातील अनेक प्रश्न सोडवले आहेत. तात्यासाहेब देशमुख पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here