जामखेड न्युज——
साकत परिसरातील सततच्या पावसामुळे पीके पाण्यात, पीके लागली सडू, पंचनामे करण्याची मागणी
जामखेड तालुक्यातील साकत परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सारखाच लहान मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. तालुक्यातील अनेक ठिकाणी पुल वाहुन गेले आहेत. शेताचे तर तळेच झाले आहे. साकत परिसरातील पीके पाण्यात गेले आहेत. पाण्यात पीके असल्याने सडू लागली आहेत. मोठ्या प्रमाणावर खर्च करून खते, बियाणे मेहणत करून खर्च केला पण सध्या पीके पाण्यात असल्याने सडू लागली आहेत. ताबडतोब पंचनामे करावेत अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
यावर्षी अनेक वर्षानंतर जुन महिन्यातील मृग नक्षत्रात पेरणी झाली होती. बळीराजाने महागडे खते, बियाणे वापरून पेरणी केली सुरवातीपासूनच रिमझिम पाऊस होता उन्ह मात्र नव्हते. यामुळे पीकांची वाढ चांगली झाली नाही. आणि आतातर अनेक ठिकाणचे पीकेच पाण्यात गेलेली आहेत. यामुळे बळीराजा चिंतेत आहे. पीके सडू लागली आहेत. पंचनामे करावेत अशी मागणी होत आहे.
परिसरातील सर्व धरणे तलाव भरले आहेत नदी ओढे खळखळून वाहत आहेत. अनेक ठिकाणी तर मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पीके पाण्यात असून सडायला लागली आहेत. तेव्हा ताबडतोब पंचनामे करावेत अशी मागणी होत आहे.
परिसरात काल मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची पीके पाण्याखाली गेले आहेत. पीके कोवळी असल्याने सडून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. साकत, खर्डा, मोहरी, दिघोळ, जातेगाव, जामखेड, फक्राबाद, धानोरा परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने परीसरातील नद्यांना, ओढ्यांना पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या अनेक दिवसात जुलै महिन्यातच प्रथमच अनेक तलाव भरले आहेत तर नद्या. ओढ्यांना पूर आला आहे. सोयाबीन, उडीद, मुग, तुर ही पीके पाण्याखाली गेले आहेत. पंचनामे करावेत अशी मागणी होत आहे.
जामखेड शहरात पावसामुळे शिवाजीनगर व संताजीनगर परिसराचा संपर्क तुटला होता. कोणत्याच रस्त्याने या भागात जाण्यासाठी रस्ता नव्हता रस्त्यावर कमरेपर्यंत पाणी वाहत होते. अनेकांना आपापल्या गाड्या बाहेरच लावून रात्री अकरा वाजता घरी जावे लागले.
सध्या जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. गटाराचे काही ठिकाणी काम झाले आहे तर काही ठिकाणी सुरू आहे. गटाराची साफसफाई नसल्याने अनेक ठिकाणी गटारे तुंबलेली होती. त्यामुळे रस्त्यावर पाणी येत होते. बीड रोडवर पण सगळीकडे पाणीच पाणी होते. या रस्त्यावर चालताही येत नव्हते. सौताडा जवळील पूलही वाहून गेला होता. सध्या पीके पाण्यात असल्याने ताबडतोब पंचनामे करावेत अशी मागणी होत आहे. साकत, पिंपळवाडी, कोल्हेवाडी, कडभनवाडी, सावरगाव, मोहा, जातेगाव, दिघोळ, मोहरी परिसरातील पीके पाण्यात आहेत.