जामखेड शहरातील अनेक भागातील रस्ते चिखलमय तसेच पाण्याच्या डबक्यातून नागरिकांचे आरोग्य धोक्यात, नगरपरिषद फक्त कर वसुलीसाठीच मूलभूत सुविधांचे तीनतेरा

0
557

जामखेड न्युज——

जामखेड शहरातील अनेक भागातील रस्ते चिखलमय तसेच पाण्याच्या डबक्यातून

नागरिकांचे आरोग्य धोक्यात, नगरपरिषद फक्त कर वसुलीसाठीच मूलभूत सुविधांचे तीनतेरा

 

जामखेड शहरातील शिवाजीनगर, संभाजीनगर, मोरेवस्ती, विद्यानगर, साईनगर, सदाफुले वस्ती यासह अनेक भागातील रस्ते चिखलमय तसेच जागोजागी पाण्याचे डबके साचलेले आहेत यामुळे नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना रस्त्यांवरून चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याचबरोबर मोठ्या प्रमाणात डासांचे प्रमाण वाढले आहे. विद्यार्थी व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे नागरिकांना आपापल्या घरी जाण्यासाठी व शाळेतील मुलांना शाळेत जाण्यासाठी रस्ता पाण्यात आहे का पाणी रस्त्यात आहे हे कळायला तयार नाही.

साईनगर मधील नागरिकांना असं वाटतं की आम्ही एखाद्या बेटावर राहतो का काय पाणी साचून राहिल्यामुळे त्यात दुर्गंधी पसरली असून मच्छर व साप विंचू तसेच डुकरांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे.


त्यामुळे साईनगर मधील नागरिकांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले असून साईनगर मध्ये लाईटचे पोल उभा केले आहेत परंतु त्याच्यावर कसल्या प्रकारचे कनेक्शन जोडलेलं नाही त्यामुळे संध्याकाळी सातच्या पुढे बाहेर बाहेर पडण्यासाठी तारेवरली कसरत करावा लागते एक कडून पाणी दुसरीकडून दुसरीकडून वेगवेगळ्या जनावरांचे भीती त्यामुळे लहान मुलांना बाहेर निघणे मुश्किल झाले आहे नगर परिषदेला वारंवार सांगूनही याची नगरपरिषद कसल्या प्रकारची दक्षता घेत नाही.

जामखेड मध्ये दोन आमदार व एक खासदार असून त्यांना जनतेची कसल्या प्रकारची काळजी नाही जामखेड नगरपरिषदेस सांगितले तर तेथील कर्मचारी हे माझ्याकडे नाही तू त्याच्याकडे जा त्याच्याकडे गेल्यानंतर ते आमच्या खात्याचं काम नाही असे स्पष्ट सांगतात आणि गेल्यानंतर जामखेड नगर परिषद मधील मुख्याधिकारी हरवले आहेत का असे वाटतं जामखेड मध्ये चार वर्षापासून नगरसेवक नसल्यामुळे जामखेड नगरपरिषदेत कुणाचाही वचक राहिलेला नसून येथील कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार चालला आहे.
(जामखेड मधील मोरे वस्ती साईनगर येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात)

चौकट
नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना रस्ते नसल्याने अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. सगळीकडे चिखल व पाण्याचे डबके साचलेले आहे. नगरपरिषद फक्त कर वसुलीसाठीच आहे मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. मुख्याधिकारी कधीच कार्यालयात नसतात त्यामुळे त्यांची बदली करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here