जामखेड जवळील एसटी बस व चारचाकी वाहनाच्या भीषण अपघातातील आणखी एकाचा मृत्यू मृत्यूची संख्या तीन

0
1686

जामखेड न्युज——

जामखेड जवळील एसटी बस व चारचाकी वाहनाच्या भीषण अपघातातील आणखी एकाचा मृत्यू

मृत्यूची संख्या तीन

 

जामखेड खर्डा रोडवरील पाच कि.मी.अंतरावरील बटेवाडी शिवारात पेट्रोलपंपा जवळ देवदर्शनाहून परतणाऱ्या तरुणाच्या चारचाकी वाहन व एसटी बसच्या झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जणांचा मृत्यू झाला होता या जखमी पैकी एकाचा आज अहमदनगर येथे दवाखान्यात मृत्यू झाला यामुळे आता तिघांचा मृत्यू झाला आहे. अक्कलकोट, तुळजापूर येथुन देवदर्शन करुन पततत आसताना जामखेड जवळ हा भीषण अपघात झाला आहे. आपघातील पाचहीजण नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता या गावचे रहिवासी आहेत.

यामध्ये विजय गंगाधर गव्हाणे, वय 24 वर्षे, पंकज सुरेश तांबे, वय 24 वर्षे, दोघे रहाणार वडगाव गुप्ता ता. नगर हे मयत झाले होते. तर आज मयुर संतोष कोळी वय 18 याचा मृत्यू झाला यामुळे अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.


या बाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव डेपोची एम 09. एफ.एल 1027 या क्रमांकाची शिर्डी हैद्राबाद ही बस बस चालक सचिन विष्णू राऊत हे प्रवाशांना घेऊन हैदराबाद कडे चालले होते. तर अक्कलकोट व तुळजापूर येथुन देवदर्शन करुन पाच तरुण चार चाकी वहाण क्रमांक एम एच 16 ए. टी. 6492 या गाडीने आपल्या नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता या गावी चालले होते.

यावेळी सोमवार दि १० रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास या एसटी बस व चारचाकी वहानाची जामखेड खर्डा रोडवरील पाच कीमी अंतरावरील पेट्रोलपंपा जवळ समोरासमोर भीषण धडक झाली. यानंतर आपघातील पाच जखमींना तातडीने जामखेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले होते. मात्र रस्त्यातच विजय गंगाधर गव्हाणे वय 24 वर्षे व पंकज सुरेश तांबे वय 24 दोघेही रा. वडगाव गुप्ता
यांचा कालच मृत्यू झाला होता तर आज दवाखान्यात उपचार घेत असताना मयुर संतोष कोळी वय 18 याचा मृत्यू झाला यामुळे अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.

सचिन दिलिप गीते वय 30 व अमोल बबन डोंगरे वय 28 रा दोघे राहणार वडगाव गुप्ता ता. नगर हे तीन जण गंभीर जखमी झाले असल्याने त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती समजताच रात्रीच्या सुमारास जामखेड पोलीस स्टेशनचे सपोनि गौतम तायडे, पो कॉ. देविदास पळसे, हनुमंत अडसुळ, दिगंबर भोरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात नेण्यात मदत केली. संजय कोठारी यांनी आपल्या रूग्गवाहिकेतून दवाखान्यात आणले. या अपघातात तीन मयत व दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात एकाच गावातील दोघांचा मृत्यू झाला असल्याने वडगाव गुप्ता गावावर शोककळा पसरली आहे.

यानंतर बस चालक सचिन विष्णू राऊत यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग विवेकानंद वाखारे, जामखेड पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी भेट दिली आहे. याबाबत सध्या जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here