जामखेड न्युज——
कोल्हेवाडी (साकत) येथील शेतकरी पुत्राची कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी पदी निवड

जामखेड तालुक्यातील साकत ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या कोल्हेवाडी येथील शेतकरी परमेश्वर कोल्हे यांचा मुलगा संभाजी कोल्हे याची निर्धारण व प्रशासकीय अधिकारी पदी निवड झाली आहे. शेतकऱ्याच्या मुलाने स्पर्धा परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल परिससरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संभाजी परमेश्वर कोल्हे रा. कोल्हेवाडी पो. साकत
ता. जामखेड जि. अहमदनगर याचे प्राथमिक शिक्षण जिल्हापरिषद प्राथमिक शाळा, कोल्हेवाडी येथे झाले माध्यमिक शिक्षण जगदंबा विद्यामंदिर, धनगर जवळका ता. पाटोदा जि. बीड येथे तर महाविद्यालय शिक्षण दादा पाटील महाविद्यालय कर्जत जि अहमदनगर येथे झाले.

बारावीला 74.83 % गुण मिळाले होते तर नंतर
बी.ए. अर्थशास्त्र मध्ये 60% गुण मिळाले
एम.ए. अर्थशास्त्र 74.25% न्यु आर्ट, कॉमर्स ऑन्ड सायन्स कॉलेज, अहमदनगर येथे झाले. नंतर बंधू
शिवाजी परमेश्वर कोल्हे (वर्ग १, उपवनसंरक्षक वनविभाग, महाराष्ट्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परिक्षेचा अभ्यास केला सोमवार दि. १० रोजी जाहीर झालेल्या निकालात संभाजी कोल्हे यांची कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी पदी निवड झाली आहे. यामुळे परिसरातून त्याच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संभाजी कोल्हे यांनी कृषी विद्यापीठ राहुरी येथे स्पर्धा परिक्षेचा अभ्यास केला कोल्हे यांच्या यशामध्ये भाऊ शिवाजी परमेश्वर कोल्हे (वर्ग १, उपवनसंरक्षक वनविभाग, महाराष्ट्रशासन), तसेच आई,वडील, वहिनी व सर्व मित्रांचे सहकार्य लाभले आहे. संभाजी कोल्हे यांच्या यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गावात अनेक ठिकाणी सत्कारही करण्यात आला आहे.

चौकट
संभाजी कोल्हे यांनी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरूणांना संदेश दिला आहे की, आपले ध्येय निश्चित करून योग्य नियोजन करा अभ्यासात सातत्य ठेवा यश निश्चित मिळणारच असे सांगितले.





