पांगुळगव्हाणच्या ग्रामस्थांचे चार दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन पुनवर्सन झाल्याशिवाय गावात चुल न पेटवण्याचा निर्णय

0
1352

जामखेड न्युज——

पांगुळगव्हाणच्या ग्रामस्थांचे चार दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन

पुनवर्सन झाल्याशिवाय गावात चुल न पेटवण्याचा निर्णय

 

बीड लोकसभा निवडणूकीत महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना आष्टी तालुक्यातील पांगुळगव्हाण या गावाने एक हजार मतापैकी 926 एकगठ्ठा मते देऊनही त्यांचा पराभव झाल्याने या गावात मागील 4 दिवसांपासून एकही चूल पेटली नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. गावातील मारोती मंदिरात ग्रामस्थांकडून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे.


आष्टी तालुक्यातील पांगुळगव्हाण गावाची लोकसंख्खा 1200 च्या घरात आहे. असुन या गावात एक हजार मतदान आहे. बीड लोकसभा निवडणूकीत या गावाने महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना 980 पैकी 926 एवढे मतदान केले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवने यांच्यासह अन्य 40 उमेदवारांना या गावातुन एकही मत मिळालेले नाही. मतदान करूनही महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याने या गावातील चुल पेटलेली नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.


पंकजा मुंडे यांना केंद्रात मंत्रीपद देऊन राजकीय पुनवर्सन झाल्याशिवाय गावात चुल न पेटवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. अन्नत्याग आंदोलनात हरीभाऊ गिते, शिवाजी गिते, नंदु गिते, गहिनीनाथ गिते, रोहिदास गिते, तानाजी गिते सहभागी झाले, अशी माहिती पांगुळगव्हानचे सरपंच तुकाराम गिते यांनी दिली.

भाजपनं प्रितम मुंडे यांचं तिकीट कापून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली होती. भाऊ, मंत्री धनंजय मुंडेंनीही पूर्ण ताकद लावली. पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बजंरग सोनावणे यांनी पंकजा यांना निसटत्या पराभवाचा धक्का दिला. पंकजा मुंडे यांना 6 लाख 77 हजार 397 मतं मिळाली तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बजरंग सोनावणेंना 6 लाख 83 हजार 950 मतं मिळाली.

फक्त 6 हजार 553 मतांनी बजरंग सोनावणे यांना पंकजा मुंडेंचा पराभव केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here