अहमदनगरच्या प्रवरा नदीत एसडीआरफ ची बोट उलटली, तिघांचा मृत्यू तर दोघांचा शोध सुरु

0
690

जामखेड न्युज——

अहमदनगरच्या प्रवरा नदीत एसडीआरफ ची बोट उलटली, तिघांचा मृत्यू तर दोघांचा शोध सुरु

 


उजनी धरणातील बोट दुर्घटना ताजी असताना आता अकोलेमधील अहमदनगर-प्रवरा नदीत एसडीआरफची बोट उलटली आहे. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. एका बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी एसडीआरफ पथकाची बोट उलटली. या बोट दुर्घटनेत ५ जण बुडाले. तिघांचा मृत्यू झाला तर दोघांचा शोध सुरु आहे.

काल अकोले तालुक्यातील सुगाव येथील रोपवाटीके जवळील प्रवरा नदी पात्रात दोन युवक बुडून मयत झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. अकोले तालुक्यातील सुगाव येथे हे युवक मुरघास बनविण्यासाठी धुमाळ वस्तीवर आले होते.

उष्णतेमुळे सदर युवक सागर पोपट जेडगुले (वय 25 रा. धुळवड ता. सिन्नर) तर अर्जुन रामदास जेडगुले (वय 18 रा. पेमगिरी, ता. संगमनेर) हे प्रवरा पाञातील पाझर तलावाजवळ आंघोळीसाठी पाण्यात उतरले असता त्यांना पाझर तलावाच्या पडणार्‍या पाण्याच्या दाबाचा व पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने या दोघेही मयत झाले आहेत.


सागर जेडगुले याचा मृतदेह ) हाती लागला असुन अकोले ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे तर अर्जुन याचा मृतदेहाचा शोध चालु असुन स्थानिक ग्रामस्थ व नातेवाईक यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती.


मात्र, बराच वेळ झाल्यानंतर प्रांताधिकारी यांनी मृतदेह सापडत नसल्याने रेस्युक्यु टीमला रवाना करत मदत पोहचवली आहे. यावेळी अकोले पोलिस स्टेशनचे कर्मचारी, कामगार तलाठी, पोलिस पाटील व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

एका बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी एसडीआरफ पथकाची बोट उलटली. या बोट दुर्घटनेत ५ जण बुडाले. तिघांचा मृत्यू झाला तर दोघांचा शोध सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here