त्रिस्तरीय सुरक्षा भेदून एक व्यक्ती ईव्हीएम ट्राँग रूममध्ये कशी – निलेश लंके महसुल व पोलीस यंत्रणेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

0
1651

जामखेड न्युज——

त्रिस्तरीय सुरक्षा भेदून एक व्यक्ती ईव्हीएम ट्राँग रूममध्ये कशी – निलेश लंके

महसुल व पोलीस यंत्रणेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

 

अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून डॉ. सुजय विखे पाटील तर महाविकास आघाडीकडून निलेश लंके असा रंगतदार सामना होत आहे. मतदान केंद्रावर काही गोंधळ होऊ नये म्हणून दोन्ही यंत्रणा सज्ज होत्या तसेच बारामती व बीड लोकसभा मतदारसंघात काही ठिकाणी गोंधळ झाला असे व्हिडिओ पुढे आल्यामुळे निलेश लंके यांच्या यंत्रणेने नगर एमआयडीसी गोडाऊन येथे ठेवलेल्या ईव्हीएम ट्राँग रूममध्ये स्वतः ची एक वेगळी यंत्रणा उभारली आहे. आणि याच यंत्रणेने काल एका व्यक्तीला रूममध्ये फिरताना दिसून आल्याचा व्हिडिओ निलेश लंके यांनी शेअर केला आहे.

निलेश लंके यांनी व्हिडिओ मध्ये म्हटले आहे की,
संरक्षणव्यवस्था थोडे उठा माणूस गोदामा पर्यंत आलाय.

काल रात्री नगर दक्षिण अहिल्यानगर मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा भेदून एका इसमाने प्रवेश करत चक्क शटरपर्यंत जात सीसीटीव्ही मध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केला माझ्या सहकार्याने तो लगेच हाणून पाडला.

माझे सहकारी हा इसम पकडू शकतात मग कोणतीही पूर्व सूचना न देताना गेलेल्या त्या व्यक्तीला त्रिस्तरीय सुरक्षा का रोखू शकली नाही? कुंपणच आता शेत खातय.. लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जातोय पण प्रशासन मात्र उघड्या डोळ्यांनी पाहतय.अशा आशयाचा व्हिडिओ शेअर केला आहे.


याबाबत मविआचे उमेदवार निलेश लंके यांचे निकटचे सहकारी राहुल झावरे यांनी त्यांच्या ऑफीसिएल व्हाट्सएपच्या ग्रुपवर सांगितले आहे की, “रात्री आठ वाजून 22 मिनिटांनी अचानक एक व्यक्ती या ठिकाणी आला पोलीस सीआरपी सुरक्षा यंत्रणा ला कोणतीही कल्पना न देता या ठिकाणी आलाच कसा

त्याच वेळेस तिथे उपस्थित असणाऱ्या निलेश लंके प्रतिष्ठान कार्यकर्त्यांना ही घटना समजली त्यांनी ताबडतोब हा व्यक्ती कोण आहे पोलिसांना विचारणा केली त्यावेळेस त्यांना सुद्धा ह्या व्यक्तीबद्दल काहीही माहिती नव्हती त्या अज्ञात व्यक्तीने सांगितले की मला फक्त कलेक्टर
साहेब विचारतील तुझं काय काम आहे बाकी कोणाचा काही संबंध नाही मी टेक्निकलचा माणूस आहे बेकायदेशीर रित्या हा माणूस तिथपर्यंत पोहोचला कसा गोदामाचा शटर जवळ गेला कसा तेरी सुरक्षा यंत्रणा असताना गोदामाचा ठिकाणच्या सीसीटीव्ही यंत्रणेमध्ये छेडछाड करत असताना निलेश लंके यांच्या जिवाभावाचा कार्यकर्ते त्याचा डाव हाणून पाडला.

केंद्र राज्य स्थानिक पोलीस ही तेहरी सुरक्षा असताना हा व्यक्ती आत आला कसा याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे” असे सांगण्यात आले आहे.याबाबत जिल्हा निवडून यंत्रणा व पोलीस यंत्रणेकडून स्पष्टीकरण आलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here