जामखेड न्युज——
प्रसिद्ध उद्योगपती कुंदनमल भंडारी यांचे निधन
जामखेड येथील प्रसिद्ध उद्योगपती कुंदनमल लालचंद भंडारी वय ६८ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले यामुळे भंडारी कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
जामखेड येथील नितीन, निलेश भंडारी आणि सौ शितल आनंदजी गुंदेचा अहमदनगर यांचे पिताश्री आणि चंदनमल लालचंद भंडारी यांचे लहान बंधू कुंदनमल लालचंद भंडारी वय ६८
हृदयविकाराच्या झटक्याने बुधवार मध्यरात्री १२:०५ वाजता दुःखद निधन झाले
रात्री १२.०० वाजता त्यांना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी आपल्या रुग्णवाहिकेत दवाखान्यात दाखल केले होते परंतु दवाखान्यात दाखल करण्याच्या अगोदरच त्यांची प्राणज्योत मावळली संदीप भंडारी, सचिन भंडारी, अमित भंडारी यांचे ते चुलते होत सतत साधुसंतांच्या सेवेत असणारे आणि समाजसेवेत अग्रेसर असणारे तेरा वर्ष जैन श्रावक संघाचे संचालक म्हणून उत्कृष्ट जैन स्थानक आणि महावीर भवन सुशोभित करण्यात ते अग्रेसर असत गोरगरिबांना मदत करणारे कुंदनमल भंडारी यांचे दुःखद निधन झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करत आहेत.
त्यांच्यावर बुधवारी सकाळी ११=०० वाजता जामखेड येथील तपनेश्वर रोडवरील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, उद्योगपती कांतीलाल कोठारी, अशोक चोरडिया, सुभाष भळगट, दिलीप पटवा, रसिकलाल पटवा, राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस महाराष्ट्र राज्य राजेंद्र कोठारी, प्रा.
मधुकर राळेभात, सुरेश भोसले, संतोष पटवा, सुशील पटवा, किशोर गांधी जयंतीलाल भंडारी ,आनंद गुंदेचा, किसन पेचे ,अनिल मेहेर, सुभाष भंडारी, संजय नहार, मिठूलाल नवलाखा, प्रफुल्ल सोळंकी,दिलीप गुगळे, निलेश बोरा, मंगेश बेदमुथ्था, संजय गांधी, पोपटकाका हळपावत, प्रमोद बोगावात, असरास बोथरा , संतोषमामा लोढा, लखीचंद बाफना ,आकाश बाफना, विनोद बेदमुथा, मंगेश बेदमुथ्था, प्रवीण छाजेड, विनोद बोरा सुनील चोरडिया ,सुमित चानोदिया, जितेंद्र बोरा, अमित बोथरा ,डॉक्टर सुनील कटारिया , दिलीप गांधी ,हिम्मत गांधी ,संपतलाल बोरा ,विजय बोगावत , अमोल तातेड, ललित बाफना, कांतीलाल बोथरा, रमेश सुराणा ,अमोल लोहकरे , अमोल चिंतामणी,कैलास शर्मा, शांतीलाल गांधी सर्व थरातील लोक अंतिम संस्कारासाठी उपस्थित होते