जामखेड न्युज——
टक्कल करून डोक्यावर तुतारीची पेंटिंग, जामखेड मधील तरूणाने वेधले सर्वांचे लक्ष

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोण काय करेल हे सांगता येत नाही. जामखेड मध्ये एका तरूणाने टक्कल करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार व मागील बाजूस रामकृष्ण हरी वाजवा तुतारी असे पेंटिंग केले आहे व तो संपूर्ण शहरात दिवसभर मोटारसायकल वर तुतारी वाजवत निलेश लंके यांचा प्रचार करत आहे.

अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील व महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यात अटीतटीचा सामना होत आहे. निलेश लंके यांच्या प्रचारासाठी प्रशांत रेडे या तरूणाने टक्कल करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व मागील बाजूस रामकृष्ण हरी वाजवा तुतारी असे पेंटिंग केले आहे. हा तरुण दिवसभर गाडीवर तुतारी वाजवत प्रचार करत आहे.

डॉ. सुजय विखे यांच्या साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री रामकृष्ण विखे पाटील, आमदार प्रा. राम शिंदे तसेच महायुतीचे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी सक्रिय आहेत.

निलेश लंके यांच्या साठी शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार यांच्या सह महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे नेते व कार्यकर्ते सक्रिय आहेत.

कर्जत जामखेड मतदारसंघात लोकसभा निवडणुक म्हणजे विधानसभेची आमदार रोहित पवार व आमदार प्रा. राम शिंदे यांच्या साठी रंगित तालिम आहे. यामुळे या मतदारसंघात कोण कोणाला मताधिक्य देणार हा खरा प्रश्न आहे.









