जामखेड न्युज——
कालच्या वादळी पावसामुळे साकतमध्ये वीज पडून बैलाचा मृत्यू, अनेक झाडे उन्मळून पडली

साकत परिसरात शुक्रवारी दुपारी तीन ते चार च्या आसपास झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे
साकत येथे वीज पडून एका बैलाचा मृत्यू झाला तसेच अनेक झाडे उन्मळून पडली तसेच पिंपळवाडी परिसरात वीजेचा खांब वाकला परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

दुपारी झालेल्या पावसामुळे साकत येथील पोपट बजिरंग मुरूमकर यांचा बैल सरकारी विहिरी जवळ आंब्याच्या झाडाखाली बांधला होता वीज पडून बैलाचा जाग्यावर मृत्यू झाला यामुळे पोपट मुरूमकर यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच परिसरात अनेक झाडे उन्मळून पडली आहेत.

घटनेची माहिती ग्रामस्थांनी तहसीलदार गणेश माळी यांना पशुवैद्यकीय अधिकारी व तलाठी यांना साकतमध्ये जाऊन पंचनामा करण्याचे आदेश दिले यानुसार पशुवैद्यकीय अधिकारी व तलाठी प्रदीप सुर्यवंशी यांनी पंचनामा केला व अहवाल वरिष्ठांना सादर केला आहे.

साकत येथील शेतकरी पोपट मुरूमकर यांचा झाडालाखाली बांधलेला बैल वीज पडून मृत्यूमुखी पडला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन खेत्रे
कामगार तलाठी प्रदीप सुर्यवंशी यांनी या घटनेचा पंचनाम केला. यावेळी डॉ. शंकर ( बाबू ) वराट, दिलीप मुरुमकर, मनोज मुरूमकर, अप्पा घोलप, विठ्ठल वराट, विठ्ठल पुलवळे, बबन गायकवाड, अतुल दळवी उपस्थित होते. महिन्यापूर्वी पांडूरंग वराट यांचा बैल वीज पडून मृत्युमुखी पडला. पिंपळवाडी परिसरात वादळाने विजेचा खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.










