जामखेड न्युज——
- मुले हीच खरी संपत्ती – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे
पिंपळवाडीच्या जिल्हा परिषद शाळेतील स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

पिंपळवाडीची जिल्हा परिषद शाळेत भौतिक सुविधेबरोबरच गुणवत्तेतही अग्रेसर आहे. शाळेमुळे आपल्या गावाचे नाव राज्यात प्रसिद्ध झाले आहे. पालकांचे, शिक्षकांचे मुलांकडे लक्ष आहे. आपली खरी संपत्ती मुले हिच आहे. असे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी सांगितले.

जिल्हा परिषद पिंपळवाडी शाळेतील मिशन आरंभ, मंथन, लक्षवेध राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा गटशिक्षणाधिकारी यांच्या हस्ते ग्रामस्थ व शाळेच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी प्राचार्य श्रीराम मुरूमकर, केंद्रप्रमुख नवनाथ बडे, मुख्याध्यापक दत्ता काळे, किसनराव वराट सर, भाऊसाहेब घोलप, आश्रू नेमाने, अशोक घोलप, दिलीप घोलप, विशाल नेमाने, महारुद्र नेमाने, गोपाळ नेमाने, लक्ष्मण घोलप, जालिंदर नेमाने, विकास टेकाळे, सोमनाथ नेमाने, शैलेश नेमाने, देवेंद्र घोलप, बाबासाहेब घोलप , प्रकाश घोलप, योगेश नेमाने, सिद्धेश्वर घोलप,शाळेचे मुख्याध्यापक राम ढवळे, वर्षा जगताप, विजय जेधे यांच्या सह अनेक ग्रामस्थ व विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य हजर होते.

मिशन आरंभ, मंथन, लक्षवेध राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत आरोही दादासाहेब नेमाने राज्यात दुसरी, तसेच राधिका घोलप जिल्ह्यात दुसरी, आरोही घोलप, प्रगती नेमाने, समर्थ मोहिते, प्रकाश नेमाने, याही विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. तसेच मिशन आरंभ मध्ये संतोषी बाळासाहेब मिसाळ, श्रेया नेमाने यांनीही यश मिळवले.

यावेळी आश्रू नेमाने, लक्ष्मण घोलप, दत्ता काळे,
श्रीराम मुरूमकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
पिंपळवाडी हे गाव साकत ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येत असून ग्रामस्थांनी लाखो रुपये लोकवर्गणी करून जिल्हा परिषदेची पिंपळवाडी प्राथमिक शाळा डिजिटल केली आहे. डिजिटल झालेली शाळा ही पिंपळवाडीची पहिलीच शाळा ठरली आहे.

आरोहीने राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. यामुळे पिंपळवाडीचे नाव पुन्हा राज्यात चमकले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय जेधे तर आभार राम ढवळे यांनी मानले


