जामखेड न्युज——
चौंडीच्या सरपंचपदी मालन अविनाश शिंदे पाटील यांची बिनविरोध निवड
तालुक्यातील राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या चौंडी ग्रामपंचायतच्या सरपंच पदी सौ.
मालन अविनाश शिंदे पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सौ. मालन शिंदे या अविनाश शिंदे यांच्या पत्नी तर अक्षय शिंदे यांच्या मातोश्री आहेत. आज त्यांची चौंडी च्या सरपंच पदी निवड झाल्याबद्दल आमदार रोहित पवार मित्रमंडळाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

अडीच वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चौंडी ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आली होती. माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा पराभव झाला होता. सर्व च्या सर्व नऊ जागा आमदार रोहित पवार यांच्या गटाच्या निवडून आल्या होत्या.

पहिल्या अडीच वर्षासाठी आशाबाई सुनिल उबाळे यांची सरपंच पदी निवड झाली होती. आता अडिच वर्षानंतर सौ. मालन अविनाश शिंदे यांची सरपंच पदी निवड करण्यात आली आहे.







