राष्ट्रीय संत आचार्य श्री महाश्रमन जी महाराज साहेब महावीर जयंती निमित्त जामखेड शहरात मानवता हाच धर्म व व्यसनमुक्त भारतासाठी देशभ्रमण

0
614

जामखेड न्युज——

राष्ट्रीय संत आचार्य श्री महाश्रमन जी महाराज साहेब महावीर जयंती निमित्त जामखेड शहरात

मानवता हाच धर्म व व्यसनमुक्त भारतासाठी देशभ्रमण

 

शांतिदूत युग प्रधान आचार्य श्री महानननश्रमन जी महाराज साहेब हे राष्ट्रीय संत असून भारतीय जैन तेरपंथ समाजाचे आचार्य आहेत मानवता हाच धर्म आणि व्यसनमुक्ती पासून भारताची सुटका हे प्रमुख उपदेश घेऊन संपूर्ण भारत मध्ये प्रत्येक तालुका शहर या ठिकाणी जाऊन उपदेश पर व्याख्यान आणि मार्गदर्शन करीत आहेत.

मागील सहा महिन्यांपासून जामखेड जैन श्रावक संघ यांच्या आग्रहामुळे महाराज साहेब येणाऱ्या 21-4-2024 महावीर जयंती उत्सव निमित्त जामखेड शहरामध्ये आगमन होत आहे. हा मोठा सुवर्णयोग आहे. एखादे राष्ट्रीय संत जामखेड मध्ये प्रथमच येत आहेत ही संपूर्ण जामखेड शहरवासीयांकरिता एक अभिमानाची गोष्ट आहे.

तरी येणाऱ्या 21 तारखेला जामखेड शहरातील सर्व जाती धर्माच्या जनतेने व्याख्यान व इतर कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे विनंती जामखेड जैन श्रावक संघ अध्यक्ष ,उपाध्यक्ष, सेक्रेटरी व सर्व ट्रस्टींनी केलेली आहे.

आचार्य श्री महाश्रमणजी महाराज साहेब आपणी धवल सेना के साथ महावीर जयंती निमित्त जामखेड शहरात येणार आहेत. बरोबर शेकडो संत आहेत. माणवता हाच धर्म व व्यसनमुक्त भारतासाठी हे देशभ्रमण सुरू आहे.

महावीर जयंती निमित्त जामखेड शहरात आचार्य श्री महाश्रमणजी महाराज साहेब यांच्या उपस्थितीत
सकाळी ९ ते १० भव्य रँली, १० ते १२ सर्व धर्मीय प्रवचन जामखेड महाविद्यालय जामखेड येथे होणार आहे. तसेच ११ ते ११.३० महामंगलपाठ असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत तरी सकल जैन समाजाच्या वतीने कार्यक्रमचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here