Wednesday, February 11, 2026
Home ताज्या बातम्या 125 धर्मवीर तरूणांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून जामखेडमध्ये आणली ज्योत ...

125 धर्मवीर तरूणांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून जामखेडमध्ये आणली ज्योत रोहिणी संजय काशिद यांनी घडविले पन्नास महिला व मुलींना मोफत छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

0
397

जामखेड न्युज——-

125 धर्मवीर तरूणांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून जामखेडमध्ये आणली ज्योत

रोहिणी संजय काशिद यांनी घडविले पन्नास महिला व मुलींना मोफत छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

 

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ वढू बुद्रुक या ठिकाणाहून जामखेड तालुक्यातील सुमारे 125 धर्मवीर तरूणांनी ज्योत जामखेड मध्ये आणली. संजय काशिद मित्रमंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले. आदरणीय गुरुवर्य श्री संभाजी भिडे गुरुजींच्या आदेशानुसार गावोगावी धर्मवीर बलीदान मास पाळला जातो. संपूर्ण महिनाभर चप्पल न घालणे, गोडधोड न खाणे, मांसाहार वर्ज्य करणे असे आचार पाळले जातात.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड शहर, शंभुसुर्य मर्दानी आखाडा व जगदंबा प्रतिष्ठान यांच्या वतीने ज्योत आणली गेली. आलेल्या धर्मवीर तरूणांचे स्वागत शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद मित्रमंडळाच्या वतीने भंडारा देऊन करण्यात आले.

तसेच महिला शिवजन्मोत्सव समितीमार्फत सर्व महिला व मुलींनी संपूर्ण महिनाभर मोठ्या श्रद्धेने धर्मवीर बलीदान मासाचे आयोजन करून दररोज श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी पुर्वी दि. 6 रोजी महिला शिवजन्मोत्सव समिती जामखेड च्या अध्यक्षा रोहिणी संजय काशिद यांच्या वतीने सुमारे पन्नास महिला व मुलींना मोफत धर्मवीर संभाजी महाराज समाधीदर्शन घडवले.


धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनी जामखेडचे ग्रामदैवत नागेश्वर मंदिर परिसरात पेटवून आणलेली धर्मवीर ज्वालाला साक्षी माणून भारतमाता व हिंदूधर्म रक्षणाची पवित्र शपथ घेण्यात आली.
पुण्यतिथी दिनी श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी जवळपास 200 हुन अधिक धारकरी तसेच माता भगिनी उपस्थित होत्या. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, भाजपा शहराध्यक्ष पवन राळेभात तसेच सर्व धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड शहर, शंभूसुर्य मर्दानी खेळ, व मल्लखांब प्रशिक्षण संस्थेच्या वतीने सहकार्य करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!