साकतमध्ये उद्यापासून भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहास सुरूवात

0
1376

जामखेड न्युज——

साकतमध्ये उद्यापासून भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहास सुरूवात

 

प्रतिपंढरपुर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साकतमध्ये अखंड हरिनाम सप्ताहास उद्या बुधवार दि. 3 रोजी सुरू होत आहे. यात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच भागवतकथा, काकडा भजन, विष्णू सहस्त्रनाम, गाथा भजन, भागवतकथा हरिपाठ, किर्तन व नंतर गावजेवण व हरिजागर असे भरगच्च कार्यक्रम असणार आहेत.

जामखेड तालुक्यातील साकत येथे अखंड विणा वादणास व नंदादीपास ६९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गुरुवर्य हभप प्रकाश महाराज बोधले राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दि. ३ पासून सुरू होत आहे व बुधवार दि. १० रोजी सांगता होणार आहे. तरी परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह संयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

पुढीलप्रमाणे मान्यवर कीर्तनकारांची किर्तनसेवा होईल
बुधवार दि. ३ रोजी हभप तुकाराम महाराज मुरूमकर श्री क्षेत्र भालचंद्र डोंगर देहू
गुरूवार दि. ४ रोजी हभप बापू महाराज दातार कोठुरेकर, ता. निफाड, नाशिक
शुक्रवार दि. ५ रोजी हभप सोमनाथ महाराज घोगरे माळशिरस
शनिवार दि. ६ रोजी हभप सौ. सोनालीताई महाराज मोरे (कापसे) आळंदी देवाची
रविवार दि. ७ रोजी सौ. वर्षाताई महाराज काळे बीड
सोमवार दि. ८ रोजी हभप ज्ञानेश्वर महाराज पवने आळंदी
मंगळवार दि. ९ रोजी गुरुवर्य प्रकाश महाराज बोधले राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ
बुधवार दि. १० रोजी हभप प्रकाश महाराज बोधले यांचे काल्याचे किर्तन होईल.


.

सप्ताहामध्ये दैनिक कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत.
श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे व्यासपीठ चालक हभप गणेश महाराज काळवणे असतील तर दररोज पहाटे ४ ते ६ गाथाभजन, सकाळी ६ ते ७ विष्णुसहस्रनाम, ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, १० ते १२ गाथा भजन, ३ ते ५.३० भागवतकथा, ५.३० ते ६.३० हरिपाठ, ७ ते ९ किर्तन नंतर गाव जेवन त्यानंतर हरिजागर होईल.

तसेच बुधवार दि. १० रोजी सकाळी ९ ते ११ हभप प्रकाश महाराज बोधले डिकसळ राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ यांचे काल्याचे किर्तन होईल तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

संयोजक हभप भिमराव महाराज मुरूमकर व हभप बाबा महाराज मुरूमकर असतील
गायनाचार्य म्हणून हभप हरिभाऊ महाराज काळे, हभप माऊली महाराज कोल्हे, काका महाराज निगुडे, पंढरीनाथ महाराज राजगुरू, हभप दिनकर महाराज मुरूमकर, गहिनीनाथ सकुंडे, अशोक महाराज सपकाळ व गुरुवर्य रामचंद्र बोधले महाराज फडावरील गायक मंडळी हजर राहतील.
मृदुंगाचार्य हभप भारत महाराज कोकाटे, अमोल महाराज चाकरवाडी, बाजीराव महाराज वराट, उत्रेश्वर महाराज वराट, शंकर महाराज माळी, रोहन गवळी, रोहित गवळी दिपक अडसूळ, विक्रम महाराज खुळे, सुनील भालेराव, श्रीराम भालेराव, महादेव गवळी, चोपदार आश्रू सरोदे, आजीनाथ पुलवळे असतील
सप्ताहासाठी मंडप सौजन्य प्रा. अरुण वराट, प्रा. मंगेश मुरूमकर, हरिदास मुरूमकर असतील तसेच जाहिरात सौजन्य कै. ओम अशोक वराट यांच्या स्मरणार्थ अशोक कुंडलीक वराट असतील
सप्ताहासाठी विशेष सहकार्य सरपंच हनुमंत पाटील यांचे आहे.
महाप्रसाद अन्नदाते म्हणून डॉ. भगवानराव मुरूमकर, प्रमोद मुरूमकर, किसन वराट सर महेश (बंटी) साळुंके, नवनाथ बहिर सर, काकासाहेब चव्हाण सरपंच सावरगाव, विनोद अशोक वराट समाजकल्याण अधिकारी, मंडप व्यवस्था आनंद मंडप डेकोरेशन साकत बळीराम लोहार यांचे आहे.

गाव जेवनाचे अन्नदाते दि. ३ कै. डॉ. प्रशांत मुरूमकर यांच्या स्मरणार्थ तसेच बाबुराव पाटील फुलचंद लहाने, दि. ४ रोजी सुरेश वराट, बाळासाहेब सानप, संतोष सानप, त्रिभुवन भोरे, दि. ५ रोजी डॉ. शामराव सुरवसे, रामभाऊ मुरूमकर, हनुमंत वराट, बबन लहाने, डॉ. सचिन मुरूमकर, दि. ६ रोजी डॉ. पल्लवी सुर्यवंशी, डॉ. सुहास सुर्यवंशी इंदिरा हाँस्पिटल, दि. ७ रोजी पंकज मुरूमकर, कैलास मुरूमकर, पोपट वराट, रमेश वराट दाजी, दि. ८ रोजी भाऊ मुरूमकर, गौतम मुरूमकर अमोल मुरूमकर, सतिश सांगळे, अँड शिवप्रसाद पाटील, दि. ९ रोजी त्रिंबक पुलवळे, अमोल पुलवळे, डॉ. अजय वराट, मच्छिंद्र मुरूमकर, अशोक मुरूमकर असतील तरी परिसरातील भाविक भक्तांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here