जामखेड न्युज——
रत्नदीपच्या चौकशी साठी पंधरा सदस्यांची समिती पंधरा दिवसांत अहवाल देणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून जिल्हा अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी रत्नदीप मेडिकल फौंडेशन च्या संस्थाचालक भास्कर मोरे याची चौकशी करणे कामी १५ जणांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. सदर समितीने १५ दिवसात शासनास तातडीने अहवाल सादर करावा असे आदेश देण्यात आले आहेत.
दि १३ रोजी रत्नदीप मेडिकल फौंडेशन च्या विरोधात गेल्या दहा दिवसांपासून शिवप्रतिष्ठान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले यांचे व कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थीनींचे सुरू आहे. या आंदोलन कर्त्यांशी चर्चा करण्यासाठी आतापर्यंत अनेक सामाजिक संस्था, अधिकारी, पदाधिकारी, आमदार रोहित पवार, विद्यापीठ समित्या आल्या व चर्चा केल्या.
दि. १३ रोजी माजी मंत्री तथा विधान परिषद सदस्य राम शिंदे यांनी दुपारी आंदोलन स्थळी येऊन भेट दिली. यावेळी त्यांनी आंदोलन कर्त्यांच्या भावना जाणुन घेतल्या. यावेळी विद्यार्थ्यांचे समायोजन, परीक्षा सेंटर बदलणे, क्रँश कोर्स यासह विविध मागण्या मांडल्या.
यावर राम शिंदे यांनी दुरध्वनीवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर संपर्क करुन आंदोलन कर्त्यांशी संवाद साधला त्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी चौकशी समिती गठीत केली आहे.
या मध्ये समिती अध्यक्ष जिल्हाधिकारी अध्यक्ष सिध्दाराम सालीमठ, सदस्य पोलीस अधिक्षक राकेश ओला, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी बापुसाहेब नागरगोजे, नाशिक विद्यापीठाचे नरहरी कळसकर , डॉ मनिष इनामदार, संदीप कुलकर्णी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संदीप पालवे, जी. वाय दायमा, डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ लोणारेचे डॉ विशाल पांडे, एच.एस. जोशी, जिल्हा शासकीय तंत्रनिकेतन नाशिक चे डॉ. जी. व्ही गर्जे.
अहमदनगर जिल्हा महीला बालकल्याण विकास अधिकारी बी. बी. वारुडकर, उपविभागीय उपविभागीय अधिकारी कर्जत नितीन पाटील अशा १५ अधिकार्यांची समिती गठीत करण्यात आली आहे.
आवश्यकता पडल्यास काही सदस्यांची या समितीमध्ये नेमणुक होऊ शकते. ही समिती सर्व प्रकरणाचा गांभीर्याने विचार करुन १५ दिवसात अहवाल सादर करेल असे आदेश देण्यात आले आहेत.