जामखेड न्युज——
पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचे चोवीस तासात आरोपीला अटक करण्याचे आश्वासन हवेत
आंदोलनकर्ते विद्यार्थ्यांपुढे पोलीस निरीक्षकाचा काढता पाय

रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्या विरोधात गेल्या सात दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. आरोपीला चौवीस तासात अटक करण्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचे आश्वासन हवेत विरले आहे. आश्वासन देऊन 72 तास झाले तरीही आरोपी अटक नाही. पोलीस कानाडोळा का करतात यामुळे आंदोलक विद्यार्थ्यांनी पोलीस निरीक्षक पाटील यांना बोलूच दिले नाही. आंदोलन कर्त्यांपुढे पाटील यांना काढता पाय घ्यावा लागला.

रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच काॅलेज मध्ये वाढीव फी, अनावश्यक फी विरोधात अनेक तक्रारी आहेत. यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, नाशिक व रायगड येथील बाटू विद्यापीठ समितीने जामखेड येथे भेट देऊन चौकशी, तपासणी केली यात अनेक आक्षेपार्ह बाबी आढळून आल्या अनेक लँब सील करण्यात आल्या आहेत.

तसेच परिसरात जखमी हरीण सापडल्याने तसेच गेल्या सहा महिन्यांपासून हरीण येथे असे तपासात दिसल्याने काल वनविभागाने वन्य जीव संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. तसेच एक हरीण पुरल्याची तक्रार होती त्यामुळे रात्री दीड वाजेपर्यंत वनविभाग जेसीबीच्या साहाय्याने परिसरात शोध घेत होते पण हाती काही लागले नाही.

काल रात्री अकरा वाजता आंदोलन कर्ते विद्यार्थी व उपोषण कर्ते शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे पांडूरंग भोसले यांची भेट घेण्यासाठी पोलीस निरीक्षक महेश पाटील आले व माईक हातात घेऊन बोलू लागले तेव्हा आंदोलन कर्ते विद्यार्थी यांनी जोरदार घोषणाबाजी केली आरोपीला अटक करा नंतर बोला तुमचे चोवीस तासाचे आरोपीला अटक करण्याचे आश्वासन काय झाले. आरोपीला आगोदर अटक करा नंतर बोला असा पवित्रा आंदोलन कर्ते यांनी घेतला. त्यामुळे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना काढता पाय घ्यावा लागला.

आरोपीला अटक करण्यात पोलीस कानाडोळा का करतात जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही व काॅलेज वर कारवाई होत नाही तोपर्यंत शेकडो विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत.

विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे पांडूरंग भोसले यांचे गेल्या सहा दिवसांपासून उपोषण सुरु आहे. रात्री बारा वाजेपर्यंत सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यीनी आंदोलन स्थळी असतात. सकाळी दहा वाजता जमतात रात्री बारा वाजेपर्यंत असतात या आंदोलनाला मनसे, संभाजी ब्रिगेड, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय सह विविध संघटना व पक्ष पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला आहे.





