नानासाहेब बांगर व किशोर बांगर यांचा शिक्षक संघात प्रवेश

0
610

जामखेड न्युज——

नानासाहेब बांगर व किशोर बांगर यांचा शिक्षक संघात प्रवेश

तीन दिवसांपुर्वी सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष तसेच प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह संभाजीराव थोरात यांच्या उपस्थितीत प्राथमिक शिक्षक संघात प्रवेश केला होता आणि आज पुन्हा शिक्षकांच्या राजकारणात व समाजकारणात अग्रभागी असणारे नानासाहेब बांगर व किशोर बांगर यांनी आज शिक्षक संघात प्रवेश केला आहे. 

राज्य सरचिटणीस महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ आबासाहेब जगताप व कर्जत शिक्षक संघ नेते मिलींद तनपुरे यांच्या उपस्थितीत जामखेड तालुक्यातील समाजकारणात अग्रेसर असणारे आदर्श वैचारिक बैठक असणारे शिक्षक श्री नानासाहेब बांगर व श्री किशोर बांगर यांनी प्राथ शिक्षक संघात जाहीर प्रवेश केला.

यावेळी जामखेड तालुक्यातील पाटोदा केंद्राचे केंद्र प्रमुख तथा शिक्षक नेते राम निकम, किसन वराट, शिक्षक नेते नारायण राऊत, विजय कुमार जाधव, दत्तात्रय यादव तसेच शिक्षक संघ तालुका अध्यक्ष श्री नानासाहेब मोरे यांच्या सह अनेक शिक्षक उपस्थित होते.

चांगल्या विचाराला साथ व शिक्षक प्रश्न सोडवणारी संघटना व प्रामाणिक शिक्षक संघात असल्याने संघात प्रवेश केल्याचे बांगर बंधुनी सांगीतले.


दोन दिवसांपूर्वीच शिक्षक नेते, शिक्षक बँक माजी चेअरमन तसेच सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष नारायण राऊत तसेच जामखेड तालुका महिला आघाडी तालुका अध्यक्ष अर्चना भोसले यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह शिवाजीराव पाटील गटाला सोडचिठ्ठी देत संभाजीराव थोरात यांच्या शिक्षक संघात प्रवेश केला होता.

यामुळे शिक्षकांच्या राजकारणात खळबळ उडाली होती. परत आता काही शिक्षकांनी प्राथमिक शिक्षक संघात प्रवेश केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here