इलेक्ट्रॉनिक वाहनांना मोठी चालना देणार – नितीन गडकरी

0
187
जामखेड न्युज – – – 
इलेक्ट्रिक वाहनांना मोठी चालना देण्याची तयारी केंद्र सरकार आता करत आहे. त्यासाठी देशातील इलेक्ट्रिक वाहन बाजारासाठी सरकार मोठे पाऊल उचलणार आहे. लवकरच आम्ही बॅटरी उत्पादनात मोठा विकास पाहू शकतो, असे सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उद्योगाबरोबरच्या बैठकीत सांगितले की, इलेक्ट्रिक वाहनांसाठी बनविलेल्या बॅटरीचे दर कमी करणे आवश्यक आहे. देशाला ऑटोमोबाईल्ससह बॅटरी तंत्रज्ञानाचे उत्पादन केंद्र बनविणे आत्म निर्भर भारतच्या दिशेने एक मोठे पाऊल असेल.
नितीन गडकरी यांच्या मते, भारतातील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात वेगाने विकास होत आहे. पीएलआय योजनेअंतर्गत वाहन क्षेत्राला यासाठी ५१७०० कोटी रुपये देण्यात आले आहेत. बजाज, टीव्हीएस, हीरो त्यांच्या उत्पादनापैकी ५० टक्के निर्यात करीत आहेत.
टाटा नेक्सन ईव्ही इलेक्ट्रिक व्हेईकल विभागातील सर्वाधिक विक्री करणारी कार आहे. टेस्ला भारतातही इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात प्रवेश करणार आहे. यासह इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणाऱ्यांनाही अनेक प्रकारे फायदा होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here