जामखेड न्युज——
श्रीनिवास पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, पाटील कुटुंबियावर दु:खाचा डोंगर
केदारेश्वर विद्यालय जातेगाव येथील सहशिक्षक श्रीनिवास सुधाकर पाटील, रा. बार्शी यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. यामुळे पाटील कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
पाटील सर हे दि. १५ ते १७ तीन दिवसांचे जिल्हास्तरीय शिक्षक क्षमतावृध्दी प्रशिक्षणासाठी कोकमठाण येथे होते. शनिवारी रात्री उशिरा आल्याने जामखेड येथे सहकारी शिक्षकाच्या घरी मुक्काम केला नंतर रविवारी सकाळी बार्शी येथे गेले. रविवारी दुपारी छातीत दुखू लागल्याने ताबडतोब बार्शीत दवाखान्यात दाखल केले. अँजिओप्लास्टी केली होती. पण ते रिकव्हर झालेच नाहीत आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
पाटील हे २००९ मध्ये यशवंत शिक्षण संस्था सोनेगाव येथे नोकरीला लागले होते. नंतर २०१८ मध्ये जातेगाव येथे बदली झाली होती. बार्शी येथे घराचे काम सुरू होते.
त्यांच्या अचानक जाण्याने पाटील कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वडिलांचे वर्षश्राद्ध दोन महिन्यांपुर्वीच झाले होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगी एक मुलगा असा परिवार आहे.
तीन दिवस कोकमठाण येथे प्रशिक्षणा दरम्यानच ते अस्वस्थ वाटत होते.