जामखेड न्युज——
साकतमध्ये शिवजयंती सोहळ्यानिमित्त 71 फुटी स्वराज्य ध्वजाचे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते लोकार्पण
सार्वजनिक शिवजयंती सोहळ्यानिमित्त साकतमध्ये भव्य दिव्य 71 फुट स्वराज्य ध्वजाची प्राणप्रतिष्ठा व लोकार्पण सोहळा आमदार रोहित पवार सह विविध पदाधिकारी व ग्रामस्थांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती. तसेच सायंकाळी भव्य दिव्य अशी पुणे येथील सुप्रसिद्ध ढोलपथकासह छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट, सुर्यकांत मोरे, राष्ट्रवादी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रशांत राळेभात, सरपंच हनुमंत पाटील, उपसरपंच राजाभाऊ वराट, नगरसेवक विकास राळेभात, दिगंबर चव्हाण, अनिल बाबर, संदिप गायकवाड यांच्या सह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
सार्वजनिक शिवजयंती सोहळ्यानिमित्त साकतमध्ये भव्य दिव्य 71 फुट स्वराज्य ध्वजाची प्राणप्रतिष्ठा व लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी विविध पदाधिकारी यांच्या सह तहसीलदार गणेश माळी, गटविकास अधिकारी, प्रकाश पोळ, पोलीस निरीक्षक महेश पाटील उपस्थित होते.
शिवजयंती व स्वराज्य ध्वज प्राणप्रतिष्ठा व लोकार्पण सोहळ्यानिमित्त रविवार दि. १८ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी अकरा वाजता स्वराज्य ध्वजाची महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी तुळजापूर मंदिर येथे पुजा करण्यात आली. सायंकाळी ७ ते १० स्वराज्य ध्वजाची भव्य दिव्य अशी मिरवणूक साकतमध्ये काढण्यात आली.
सोमवार दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी सकाळी ७ ते ९ या काळात 71 फुट स्वराज्य ध्वजाची प्राणप्रतिष्ठा व लोकार्पण सोहळा आमदार रोहित पवार व विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला यानंतर सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांची महाआरती व महाप्रसाद वाटप करण्यात आला.
सायंकाळी ७ ते १० या काळात पुणे येथील सुप्रसिद्ध ढोलपथक सह छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.