मनसेच्या वतीने आयोजित शिवजयंती उत्सवात अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते पुजन

0
353

जामखेड न्युज——

मनसेच्या वतीने आयोजित शिवजयंती उत्सवात अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते पुजन

जामखेड शहरातील नगर रोड येथील सेंटर काॅम्प्लेक्स येथे सार्वजनिक शिवजयंती मनसे महोत्सव २०२४ निमित्त शिवप्रतिमा पूजनाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० वाजता जामखेडचे तहसीलदार गणेश माळी व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीचे पूजन व महाआरती करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते निलेश (भाऊ) गायवळ होते. कार्यक्रमाचे
आयोजक पै. हवा (दादा) सरनोबत, मनसे अध्यक्ष प्रदीप टापरे, सनी सदाफुले, सरपंच पै. बापुसाहेब कार्ले, नगरसेवक महेश निमोणकर, गणेश पवार, पांडुराजे भोसले, शिवसेना ता.अध्यक्ष कैलास माने (सर), लक्ष्मण कानडे, संजय कार्ले, पै.राजुभैय्या सय्यद, भोरे मेजर, नानासाहेब मुळे, जकिर शेख सर, गणेश नरके सर, संजय बेरड, भाऊ आमटे, डाॅ.कैलास हाजारे, पै.नितीन जाधव, बी.के.शिदें सर, दादा गाडे, भरत नाना भोगल ,पै.नितीन सपकाळ, पै.वशिष्ट माने, पै.दत्ता सरनोबत, पै.शेखर कार्ले, पै.बालु साठे, पै.राहूल जगताप, दादा भोंडवे, राजेंद्र मोहिते, विशाल कदम, पै.पप्पू क्षिरसागर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दिवसभर विविध मान्यवर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन घेत होते. मनसेच्या वतीने आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here