जामखेड न्युज——
सुधीर राळेभात यांचा आमदार रोहित पवारांच्या वतीने सत्कार संपन्न
अहमदनगर जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्था मर्यादित अहमदनगर व्यवस्थापन पंचवार्षिक निवडणूकीत माननीय सुधीर जगन्नाथ राळेभात यांनी विजय संपादन केल्याबद्दल आमदार रोहित पवारांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
जिल्हा सहकारी बँकेच्या कार्यालयात सुधीर राळेभात यांचा सत्कार आमदार रोहित पवारांच्या वतीने करण्यात आला. यावेळी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, संचालक नारायण जायभाय, विठ्ठल चव्हाण, सुरेश पवार, राहुल बेदमुथ्था, गजानन शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, ज्येष्ठ नेते किसनराव ढवळे यांच्या सह अनेक मान्यवर पदाधिकारी तसेच तालुक्यातील सेवा संस्थेचे चेअरमन व संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, सहकार महर्षी जगन्नाथ राळेभात यांच्या विचारांचा वारसा घेऊन सुधीर व अमोल सहकारात काम करत आहेत. या दोन्ही बंधुंना भविष्यात कायमस्वरूपी सहकार्य करण्यात येईल. तसेच जे पक्षासाठी एकनिष्ठ पणे काम करत आहेत त्यांना भविष्यात संधी दिली जाईल व सहकार्य केले जाईल तसेच जे कार्यकर्ते पक्षांतर करतात दोन्ही डगरीवर आहेत त्यांचा चांगलाच समाचार घेतला.
यावेळी अहमदनगर जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्था मर्यादित अहमदनगर व्यवस्थापनचे नवनिर्वाचित संचालक सुधीर राळेभात यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, सहकार महर्षी जगन्नाथ राळेभात यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवू अशी ग्वाही दिली व मतदारांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांनी तर आभार संचालक सुरेश पवार यांनी मानले.