वकृत्व स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध होते – मंगेश (दादा ) आजबे शिवजयंती महोत्सवानिमित्त प्रा. प्रदीप बहिर यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

0
770

जामखेड न्युज——

वकृत्व स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध होते – मंगेश (दादा ) आजबे

शिवजयंती महोत्सवानिमित्त प्रा. प्रदीप बहिर यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

 

 

विविध स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळत असते. वकृत्व स्पर्धा सुद्धा हा त्यातील एक चांगला उपक्रम असून विद्यार्थ्यांना स्वतःमधील विचार मांडण्याची संधी या वकृत्व स्पर्धेच्या माध्यमातून मिळत असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका प्रमुख मंगेश (दादा) आजबे यांनी केले.

शिवजयंती महोत्सवानिमित्त प्रा. प्रदीप बहिर यांच्या वतीने भव्य तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दि. १८ फेब्रुवारी रोजी कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मंगेश आजबे यांच्या हस्ते करण्यात आले.

आज आमदार रोहित पवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. ट्रॉफी, रोख रक्कम, प्रमाणपत्र, बक्षीस वितरण करण्यात आले.

प्रथम क्रमांक -भक्ती चंद्रकांत राऊत
द्वितीय क्रमांक -स्नेहा आशिष मलकट्टे
तृतीय क्रमांक -भक्ती रावसाहेब नेटके यांनी पारितोषिके पटकावली.

यावेळी कार्यक्रमासाठी डॉ. कैलास हजारे, शिवव्याख्याते प्रा.जाकीर शेख, विष्णू गंभीरे, सावरगावचे सरपंच काका चव्हाण, पाडळीचे सरपंच बाळासाहेब खैरे, खांडवी ग्रामपंचायतचे उपसरपंच दिपक नेटके, शरद ढवळे आदी उपस्थित होते. या स्पर्धेत जवळपास ३० स्पर्धक सहभागी झाले. यावेळी मंगेश आजबे म्हणाले की, प्रा.प्रदीप बहिर सर यांनी हा कौतुकास्पद उपक्रम शिवजयंती महोत्सवानिमित्त तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले.

शिवव्याख्याते प्रा.जाकीर शेख सर यांनी आपल्या भाषणात असे सांगितले की, प्रत्येक विद्यार्थ्याने शिवरांयाचां आदर्श विचार व त्यांचे संस्कार जपले पाहिजेत. त्यांच्या विचाराची शिदोरी आपल्या पाठीशी बांधुन ठेवली पाहिजे. शिवरायांना डोक्यावर न घेता डोक्यात घेतले पाहिजे. शिवरांचा एकजरी गुण घेतला तर यश पाया जवळ लोटांगण घेईल. शिवरायांनी संपुर्ण मानव जातीवर प्रेम केले. आठरा पगड जातीला बरोबर घेऊन शिवरायांनी माणुसकीचा जागर केला.

या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम उगले सर, शिंदे सर, पार्थ बहिर यांनी घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भाकरे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. प्रदीप बहीर सर यांनी मानले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जामखेड तालुका येथे भव्य तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आयोजक प्रदीप बहिर सर यांनी केले होते आज आमदार रोहित पवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. ट्रॉफी, रोख रक्कम, प्रमाणपत्र, बक्षीस वितरण करण्यात आले.

प्रथम क्रमांक -भक्ती चंद्रकांत राऊत
द्वितीय क्रमांक -स्नेहा आशिष मलकट्टे
तृतीय क्रमांक -भक्ती रावसाहेब नेटके
यांनी क्रमांक पटकावले या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य- अमोल गिरमे युवा नेते राष्ट्रवादी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here