शिवजयंतीनिमित्त जामखेड सायकल क्लबच्या वतीने प्रदुषणमुक्ती साठी सायकल रॅली

0
445

जामखेड न्युज——

शिवजयंतीनिमित्त जामखेड सायकल क्लबच्या वतीने प्रदुषणमुक्ती साठी सायकल रॅली

 

मानवी स्वास्थ्य रक्षण व पर्यावरण रक्षणासाठी तसेच पर्यावरण समतोल, चांगले आरोग्य व इंधन वाचविण्यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत
जामखेड सायकल क्लब व जामखेड तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन च्या वतीने शहरात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी सायकलचे ब्रँड अँबेसिडर डॉ. पांडुरंग सानप, जामखेड ते अजमेर सायकल प्रवास करणारे समिर शेख, डॉ. संजय राऊत अध्यक्ष जामखेड तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर, सुदाम वराट अध्यक्ष जामखेड मिडिया क्लब, बाळासाहेब औटे, प्रविण शिंदे, अभिनव काकडे, अभिषेक घोडके, रामेश्वर सुर्यवंशी, वैभव सानप, दत्ता पडोळे, तुकाराम कुलथे, डॉ. अशोक बांगर, उमेश घोडके, श्लोक जाधव, सार्थक जगताप, सोहम वारंगुळे, युवराज मगर, आप्पा भोरे, बाळासाहेब मुरूमकर यांच्या सह मोठ्या संख्येने सायकल स्वार सहभागी झाले होते.


शिवजयंती निमित्ताने पर्यावरण रक्षणासाठी तसेच चांगले आरोग्य व इंधन बचतीचा संदेश देत जामखेड सायकल क्लबच्या वतीने बीड रोड सानप हाँस्पिटल पासून शिवाजीनगर, पोलीस स्टेशन, जयहिंद चौक, संविधान चौक, बसस्थानक, तपनेश्वर रोड या मार्गी परत बीड रोडला येत सांगता झाली.


चांगल्या आरोग्यासाठी सायकल चालविणे हा सर्वांत उत्तम पर्याय असून त्यामुळे मानसिक व शारीरिक स्वास्थही मिळते, हा संदेश सायकल रॅलीतून सर्वांनी स्वीकारला तर देशाचे भविष्य उज्ज्वल असेल,’ अशी भावना या वेळी व्यक्त करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने जामखेड मधील तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन, पत्रकार, शिक्षक, व्यावसायिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, सायकल वापरा प्रदुषण मुक्त व्हा, इंधन बचत करा, सायकल वापरा फिट राहा अशा घोषणा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here