जामखेड तालुक्यातील सात शाळांना आमदार सत्यजित तांबे यांच्या कडून संगणक वाटप

0
612

जामखेड न्युज——

जामखेड तालुक्यातील सात शाळांना आमदार सत्यजित तांबे यांच्या कडून संगणक वाटप

 

शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणाऱ्या आ. सत्यजीत तांबे यांनी जामखेड तालुक्यातील सात शाळांना संगणक दिले आहेत. यामुळे या शाळांना निश्चितच शैक्षणिक फायदा होणार आहे.

जामखेड तालुक्यातील छत्रपती शिवाजी विद्यालय जवळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रत्नापूर, जिल्हा परिषद प्राथमिक ऊर्दू शाळा मुली जामखेड, पंचक्रोशी विद्यालय नायगाव, साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय पाडळी, श्री साकेश्वर विद्यालय साकत, न्यू इंग्लिश स्कूल राजुरी अशा सात शाळांना संगणक वाटप करण्यात आले.

यावेळी विकास पवार यांनी संगणक वितरित केले. यावेळी ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग, न्यु इंग्लिश स्कूल राजुरीचे मुख्याध्यापक श्रीधर जगदाळे, जोरे साहेब, सोले सर, जाकीर सर, सोमनाथ उगले, जोगदंड मँडम, सुदाम वराट यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.


मागील महिन्यात आमदार सत्यजित तांबे यांनी
पुण्यातील शिक्षण आयुक्तांच्या कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक संपत सुर्यवंशी, प्राथमिक विभागाचे उपसंचालक कुलाळ, पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक प्रवीण अहिरे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

अनेक संस्थांमध्ये शिक्षकांची किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. अशा संस्थांना जाहिरात काढून भरती प्रक्रिया राबवण्याची परवानगी द्यावी, या प्रमुख मागणीवर या बैठकीत चर्चा झाली. तसंच ज्या प्रमाणे अर्धवेळ शिक्षक पूर्णवेळ होताना त्यांनी अर्धवेळ पदी असताना केलेली सेवा ग्राह्य धरतात, त्याचप्रमाणे ग्रंथपालांची अर्धवेळ सेवाही ग्राह्य धरावी. त्यासाठी ७ नोव्हेंबर २०२३ त्या शासन निर्णयाचा आधार घ्यावा,२००५ पासून सेवेत असलेल्या ग्रंथपालांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ व्हावा, या प्रमुख मागण्यांवरही चर्चा झाली.

चौकट

शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणारे आमदार सत्यजीत तांबे यांनी जामखेड तालुक्यातील खर्डा येथे पस्तीस लाख रुपयांचे वाचनालय मंजूर केले आहे. तसेच ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अडिच लाख रुपयांचे पाणी फिल्टर मंजूर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here