जामखेड न्युज——
प्राचार्य मडके बी के यांची रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद म्हणून निवड
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीच्या ठरावानुसार श्री नागेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य मडके बी के यांची रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद म्हणून निवड झाली आहे. याबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय व कन्या विद्यालय संयुक्त विद्यमाने प्राचार्य मडके बीके यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष नागेश विद्यालय स्कूल कमिटीचे मार्गदर्शक रा कॉ प्रदेश सरचिटणीस ( शरदचंद्र पवार गट) राजेंद्रजी कोठारी, हरिभाऊ बेलेकर , कन्या विद्यालय स्कूल कमिटी सदस्य प्रा मधुकर आबा राळेभात, सुरेश भोसले, उद्योजक विनायक राऊत, मुख्याध्यापिका चौधरी के डी ,पर्यवेक्षक कोकाटे व्ही के पर्यवेक्षक संजय हजारे ,गुरुकुल प्रमुख संतोष ससाने ,शिवाजीराव ढाळे, अमोल बहिर ,साळुंखे बीएस ,रघुनाथ मोहोळकर ,प्रा विनोद सासवडकर ,प्रा कैलास वायकर, एनसीसी ऑफिसर मयुर भोसले ,अजय अवचरे नागेश विद्यालय कन्या विद्यालय सर्व विद्यार्थी शिक्षक वृंद रयत सेवक उपस्थित होते.
मनोगत मध्ये मुख्याध्यापिका चौधरी के डी यांनी मडके साहेब यांची सदस्य निवड झाल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेमध्ये त्यांच्या कार्याची देखल घेतली आहे असे मनोगत केले.
शिवाजीराव ढाळे रयत शिक्षण संस्था आशिया खंडातील सर्वात मोठे संस्थेचे अजीव सदस्य होणे ही अभिमानास्पद बाब आहे ते मनोगत व्यक्त केले.
सुरेश भोसले यांनी सांगितले की, बहुजनांसाठी कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली त्या संस्थेचे आजीव सदस्य होणे म्हणजे कौतुकाची बाब आहे. व पुढील कार्यास शुभेच्छा देतो असे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्रजी कोठारी यांनी मनोगतामध्ये आमदार रोहित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नगेश व कन्या विद्यालय प्रगतीपथावर चालले आहे .मडके सरांच्या कार्यामुळे त्यांची संस्थेने दखल घेतली आणि आजीव सदस्य केले त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी इंगळे तर आभार प्रदर्शन संतोष ससाणे यांनी केले.