गाव चलो अभियानात डॉ. संजय भोरे यांच्याकडे खुरदैठण गावची जबाबदारी भाजपाच्या योजना वाडीवस्तीवरील लोकापर्यंत

0
199

जामखेड न्युज——

गाव चलो अभियानात डॉ. संजय भोरे यांच्याकडे खुरदैठण गावची जबाबदारी

भाजपाच्या योजना वाडीवस्तीवरील लोकापर्यंत

 

भाजपचे गाव चलो अभियाना अंतर्गत आज डॉ संजय भोरे यांचे कडे खुरदैठण गावाची जबाबदारी दिली होती. आज सकाळी खुरदैठण येथील युवक, वयोवृद्ध, मध्यमवयीन लोकांशी, संवाद साधुन,केंद्र व राज्य सरकारच्या सबका साथ, सबका विकास,सबका विश्वास या प्रकारे तसेच मोदी की गांरटी,सशक्त शेतकरी समृद्ध भारत आयुष्यमान भारत या सरकारच्या वेगवेगळ्या योजनांविषयी चर्चा करत लोकांची मते अडचणी जाणून घेतल्या.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजप ने पक्षाची धोरणे, मोदी सरकार आणि महायुती सरकार ने केलेली विकास कामे घराघरात पोहोचवण्यासाठी, तसेच सरकारी योजनांपासुन वंचित घटकांना लाभ मिळवुन देण्यासाठी ” गाव चलो अभियान ” सुरू केले आहे.

गाव चलो अभियातर्गत अभियानांतर्गत डॉ. भोरे यांनी तेथील युवक,वयोवृद्ध, मध्यमवयीन लोकांशी, संवाद साधुन,केंद्र व राज्य सरकारच्या सबका साथ, सबका विकास,सबका विश्वास या प्रकारे तसेच मोदी की गांरटी,सशक्त शेतकरी समृद्ध भारत आयुष्यमान भारत,महिला शक्तिला नवी गती , (सुकन्या समृद्धी योजना) मेट्रो रेल्वे ची सुरूवात पायाभूत सुविधांचा अभूतपूर्व विकास

पाच लाखापर्यंत मोफत विमा, समृद्धी महामार्ग समुद्रावरील सर्वात लांब पूल ( अटल सेतु) कृषी कल्याण योजना, गडकिल्यांचे व तिर्थक्षेत्रांचे संवर्धन पी एम आवास योजना,अयोध्या मध्ये राम मंदिर बांधकाम पूर्ण झाले, कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यामध्ये घट अशा विविध योजना बद्दल माहिती दिली.


त्यावेळी गावातील खुरदैठण बुथ प्रमुख-नितीन डुचे,अनिल ठाकरे, प्रविण करडकर,रोहन डुचे,महादेव घोगरदरे , शहाजी डुचे,अक्षय ठाकरे,एकनाथ पवार,रामदास घोगरदरे,दत्तात्रय घोगरदरे,भिम बाळासाहेब डुचे,ओंकार मदने, कृष्णा राजेंद्र डुचे, विराज डुचे, भरत डुचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here