जामखेड न्युज——
गोकुळ गायकवाड यांना वाड्ःमय पुरस्कार प्रदान.
आदर्श पदवीधर शिक्षक, बौद्धाचार्य, साहित्यिक श्री गोकुळ श्रीरंग गायकवाड यांच्या “माझा गाव माझी माणसं ” या चरित्र ग्रंथास लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे वाड्ःमय पुरस्कार २०२४ पद्मश्री गिरीश प्रभुणे संमेलन अध्यक्ष, पद्मश्री दादा इदाते अनु.जाती जमाती आयोगाचे सदस्य, प्रा.डॉ धनंजय भिसे अध्यक्ष मातंग साहित्य परिषद पुणे यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
रविवार दि.११/०२/२०२४ रोजी मातंग साहित्य परिषद पुणे यांचे मार्फत आयोजित दुसऱ्या मातंगऋषी साहित्य संमेलना जि.प.प्राथ. शाळा रत्नापूर ता जामखेड येथे कार्यरत असणारे आदर्श पदवीधर शिक्षक, बौद्धाचार्य, साहित्यिक श्री गोकुळ श्रीरंग गायकवाड यांच्या “माझा गाव माझी माणसं ” या चरित्र ग्रंथास लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे वाड्ःमय पुरस्कार २०२४ पद्मश्री गिरीश प्रभुणे संमेलन अध्यक्ष, पद्मश्री दादा इदाते अनु.जाती जमाती आयोगाचे सदस्य, प्रा.डॉ धनंजय भिसे अध्यक्ष मातंग साहित्य परिषद पुणे यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
या यशाबद्दल श्री गोकुळ गायकवाड यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे जामखेडचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे साहेब, विस्तार अधिकारी शिक्षण, सुनील जाधव साहेब, केंद्रप्रमुख राजेंद्र त्रिंबके, केशव गायकवाड साहेब, सुरेश मोहिते साहेब, नवनाथ बडे साहेब, राम निकम साहेब, शिक्षक बॅंक संचालक संतोष राऊत सर , विश्वस्त मुकुंदराज सातपुते सर एकनाथ दादा चव्हाण, पांडुरंग मोहळकर, निशा कदम अर्जुन पवार सर, गौतम सोले, बाळासाहेब औटे सर, आदी मान्यवरांनी अभिनंदन केले व पुढील साहित्य कार्यास शुभेच्छा दिल्या.
“धम्मपदा बोलती दोहे आणि गाथा ” या वैचारिक ग्रंथास जेष्ठ साहित्यिक प्रा.रसुल सोलापूरे बहुउद्देशीय संस्था महागाव ता.गडहिंगज जि. कोल्हापूर या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. विविध साहित्य लेखन प्रकारातील नुकतेच राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले आहेत.
गिरलगाव ता भूम जि धाराशिव येथील सुपुत्र, जि.प.प्राथ.शाळा रत्नापूर ता जामखेडचे आदर्श शिक्षक,बौध्दाचार्य,लेखक गोकुळ गायकवाड यांनी बुध्दांची धम्मपदं संत कबीर यांच्या दोह्यात आणि संत तुकाराम महाराज यांच्या गाथेत आहेत हे शोधून सप्रमाण सिद्ध केले आहे.या ग्रंथास हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला होता.