जामखेड न्युज——
सारोळा शाळेत किशोरवयीन मुलींसाठी समुपदेश सत्राचे आयोजन
मुलींनी व्यक्तीमत्व विकास व शारिरीक सदृढतेवर भर द्यावा- डॉ. पल्लवी सूर्यवंशी मॅडम
दि.7 फेब्रुवारी 2024 रोजी जि.प. प्रा. शाळा सारोळा या ठिकाणी इंदिरा हॉस्पिटल जामखेडच्या संचालिका,शांत, संयमी व अभ्यासू व्यक्तिमत्व, सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ.पल्लवी सुहास सूर्यवंशी मॅडम (MBBS,DGO) यांनी “बदलत्या जीवनशैली मुळे उद्भवलेले आजार आणि मुलींचे समुपदेशन” या विषयावर अतिशय मार्मिक,समर्पक व सुंदर शब्दात मार्गदर्शन केले.
या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मार्गदर्शिका डॉ. सूर्यवंशी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करताना स्वच्छतेच्या सवयी, गुड टच बॅड टच, पालेभाज्या,मोड आलेले कडधान्य, गूळ शेंगदाणे आदि सकस आहार घ्यावा,विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे, पहाटे उठून किमान अर्धा तास चालणे किंवा मैदानी खेळ खेळण्याचा सल्ला दिला.
तसेच मुलींचे समुपदेशन करताना, मासिक पाळी व त्याचे योग्य व्यवस्थापन करणे,बदलत्या जीवनशैली नुसार उद्भवाणारे आजार मधुमेह, लठ्ठपणा,पोट-डोळे-दात यांचे विकार या आजारांविषयी माहिती दिली.मासिक पाळी हा एक आजार नसून ती एक सामान्य शारीरिक क्रिया आहे असेही त्यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले.उत्कृष्ठ व प्रभावी रित्या मार्गदर्शन केल्याबद्दल डॉ. सूर्यवंशी मॅडम यांचा शाळेच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक जगताप सर,शेख सर,लिमकर सर, सोळंके सर, होळकर सर,शेख मॅडम,रसाळ मॅडम व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
या स्तुत्य अशा उपक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन केल्याबद्दल, जामखेड तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी माननीय श्री.धनवे साहेब तसेच सारोळा गावच्या सरपंच रितूताई काशिद, भाजपा तालुका अध्यक्ष अजयदादा काशिद,उपसरपंच हर्षद मुळे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर सातपुते,उपाध्यक्ष राजेंद्र आजबे,पालक व ग्रामस्थ यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थी यांचे कौतुक केले.
जाहीर नोटीस – लिलाव
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वनवेवस्ती ता. जामखेड जि. अहमदनगर या शाळेच्या एका वर्गखोलीचे निर्लेखन मंजूर झाले आहे. सदर मालमत्तेतील लोखंड, दरवाजा, खिडक्या, फरश्या आदी वस्तुंचा जाहीर लिलाव आहे त्या स्थितीत करायचा आहे ;तरी ज्यांना लिलाव घ्यायचा आहे त्यांनी शनिवार दि.१०/२/२०२४ रोजी सकाळी १०. वाजता शाळेच्या आवारात उपस्थित राहावे. योग्य किंमत न आल्यास किंवा काही कारणास्तव लिलाव रद्द करण्याचा अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला असेल.
टीप:लिलावापूर्वी बयाना रक्कम भरणे गरजेचे आहे.
आपले नम्र अध्यक्ष व सचिव शाळा व्यवस्थापन समिती वनवेवस्ती ता. जामखेड जि. अ. नगर