जामखेड न्युज——
प्रा. सचिन गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त सोनेगाव ग्रामपंचायतचा अनोखा उपक्रम

आपल्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात असाच अनोखा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते सचिन गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त सोनेगाव ग्रामपंचायतने
गावातील गरजू लाभार्थी शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचे वाटप करण्यात आले. यामुळे सुमारे दोन कोटी चार लाख रुपयांचा निधी गावात येणार आहे.

याबाबत माहिती अशी की, सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक सचिन सर गायवळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोनेगाव ग्रामपंचायत अंतर्गत 51 शेतकऱ्यांना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक प्रत्येकी चार लाख रुपये अनुदान मंजूर झाले आहेत. अशाप्रकारे एकूण दोन कोटी चार लाख रुपये सोनेगावकरांसाठी वैयक्तिक विहिरीच्या अनुदानासाठी मंजूर झाले आहेत.

प्रा.सचिन सर गायवळ यांचा वाढदिवस 28 जानेवारी रोजी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो, सोनेगावचे सरपंच डॉ. विशाल वायकर यांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी शेतकऱ्यांसाठी विहिरीचे अनुदानाचे प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल करून मोठ्या कष्टाने कागदपत्राचे पूर्तता करून त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला व सोनेगाव येथील 51 शेतकऱ्यांना वैयक्तिक अनुदानाच्या सिंचन विहिरी मंजूर करून आणल्या.

त्या विहिरींच्या अनुदानाचे वाटप प्रा. सचिन सर गायवळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक आगळावेगळा कार्यक्रम घेऊन शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे सोनेगाव येथील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

तसेच तसेच आणखी शंभर विहिरींचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर मंजूर करण्याचे काम होणार आहे त्याचबरोबर सोनेगाव येथील ग्रामस्थांना पंचायत समितीच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ देण्याचे कामही इथून पुढच्या काळात करणार असल्याचे सरपंच डॉ.विशाल वायकर यांनी सांगितले.

चौकट
सामाजिक कार्यकर्ते सचिन गायवळ यांच्या मुळे गावात व परिसरातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले आहेत. यामुळे आम्ही गावातील खरे लाभार्थी जे आहेत त्यांची यादी करत पंचायत समितीला सादर केले यातील ५१ शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरी दोन कोटी चार लाख रुपयांच्या मंजुरी मिळाली आहे. उद्या लाभार्थी शेतकऱ्यांना कामाचे आदेश वितरण करण्यात येणार आहे.










