जामखेड न्युज——
विनोदाचे बादशहा हभप मधुकर महाराज गिरी यांचे उद्या लमाण बाबा येथे किर्तन
विनोदाचे बादशहा, आपल्या वाणीने श्रोत्यांना खळखळून हसवणारे प्रसिद्ध किर्तनकार हभप मधुकर महाराज गिरी यांचे किर्तन उद्या गुरूवार दि. २५ रोजी पिंपळवाडी फाटा येथील लमाण बाबा यांच्या सप्ताहानिमित्त दुपारी १२ ते २ या वेळेत होणार आहे तरी भाविक भक्तांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
सध्या सोशल मीडियावर हभप मधुकर महाराज गिरी यांच्या किर्तनाचे अनेक भाग दाखवले जातात ते लोकांना खळखळून हसवतात ते उद्या आपल्या परिसरात येत आहेत.
जामखेड साकत रस्त्यावर पिंपळवाडी फाटा येथे लमाण बाबा यांचे मंदिर आहे. परिसरातील अनेक भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात. तसेच जागृत देवस्थान म्हणून लोकांची श्रद्धा आहे.
उद्या गुरूवार दि. २५ रोजी हभप मधुकर महाराज गिरी यांच्या हरी किर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
किर्तनानंतर महाप्रसाद होईल तरी पिंपळवाडी, साकत, सौताडा,पंचक्रोशी तील भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.