देशपातळीवरील स्मार्ट इंडिया हँकेथाँन महाअंतिम फेरीत हर्ष डुचे यांच्या टिमला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल जिल्हा सहकारी बँक जामखेडच्या वतीने सत्कार

0
226

जामखेड न्युज——

देशपातळीवरील स्मार्ट इंडिया हँकेथाँन महाअंतिम फेरीत हर्ष डुचे यांच्या टिमला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल जिल्हा सहकारी बँक जामखेडच्या वतीने सत्कार

 

 

नुकताच स्मार्ट इंडिया हँकेथाँन महाअंतिम सोहळा पार पडला यात देशभरातील इंजिनिअरिंगचे विद्यार्थी सहभागी झाले होते. जेएसपीएम इंपिरियल काॅलेज आँफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पुणे येथील
टीम लिडर हर्ष डुचे यांच्या टीमला प्रथम क्रमांकाचे एक लाख रुपयांचे बक्षीस मिळाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या टीमचे अभिनंदन करत सर्व स्पर्धक टीमला संबोधित केले होते. याबद्दल जिल्हा बँक जामखेड येथे सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हा सहकारी बँक जामखेड येथे त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात,मार्केट कमिटीचे माजी सभापती व विद्यमान संचालक श्री.सुधीर दादा राळेभात, महादेव डुचे, भारत काकडे, पृथ्वीराज वाळुंजकर,जयवंत सावंत यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जेएसपीएम इंपिरियल काॅलेज आँफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पुणे या काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी
हर्ष डुचे यांच्या नेतृत्वाखाली स्मार्ट इंडिया हँकेथाँन महाअंतिम फेरीत प्रथम क्रमांक पटकावला यात सहभागी विद्यार्थी प्रेम बोराटे,क्षितीजा देशमुख, मयांत भटगरे, आदित्य तोटे, प्रणव सोनवणे हे होते या सर्वांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले होते. यानुसार आज जामखेड येथे सत्कार करण्यात आला.

यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, एकविसाव्या शतकात जय जवान जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान या मंत्रानुसार मार्गक्रमण करावयाचे आहे. आपला प्रयत्न पुढील हजार वर्षांच्या भारताचा पाया मजबूत करणार आहे. देशातील युवा शक्ती स्मार्ट इंडिया हँकेथाँन च्या माध्यमातून विकसित भारतासाठी उपायांचे अमृत काढत आहे.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, एआय वेगाने प्रगती करत आहे. नागरिकांनी नवीन तंत्रज्ञानाबाबत सतर्क रहावयास हवे.

चिरंजीव हर्ष यांस Ministry of Jal Shakti अंतर्गत Smart India Hackathon(SIH) हा पुरस्कार हैद्राबाद या ठिकाणी मिळाला होता यानिमित्ताने आज सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here