पुजा देशमुख यांना पुणे उद्योग भूषण “मेकअप आर्टिस्ट ऑफ दि इयर २०२४” हा मानाचा पुरस्कार प्रदान

0
95

जामखेड न्युज——

पुजा देशमुख यांना पुणे उद्योग भूषण “मेकअप आर्टिस्ट ऑफ दि इयर २०२४” हा मानाचा पुरस्कार प्रदान

 

जामखेड प्रतिनिधी पुणे येथील स्विफ्ट न लिफ्ट संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध व्यावसायाला दिशा देणाऱ्या प्रमुख उद्योजक रत्नांचा गौरव करण्यात आला. बारामती मधील ऑरेंज मेकअप अँड ब्युटी स्कूल, बारामती च्या संस्थापक व ब्यूटीशियन अँड मेकअप आर्टिस्ट पूजा देशमुख यांना नामांकित पुणे जिल्ह्यातील पुणे उद्योग भूषण २०२४ अंतर्गत “मेकअप आर्टिस्ट ऑफ दि इयर” हा मनाचा पुरस्कार पुणे येथील समारंभात प्रदान करण्यात आला.

मराठी सिनेअभिनेत्री सायली संजीव यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. मुळच्या बेनवडी, ता. कर्जत यांनी गेल्या १० वर्षांपासून ब्युटी पार्लर व्यवसायापासुन सुरुवात करून अल्पावधि मध्ये बारामती च्या ब्युटी अँड मेकअप क्षेत्राला एक वेगळ्या उंचीवरती घेऊन जाण्याचा मानस बांधला आहे. त्या स्वतः स्थापित ऑरेंज स्किल्स फॉउंडेशन च्या अध्यक्ष असून त्यांनी बारामती पंचक्रोशीतील अनेक महिलांना प्रेरित आणि प्रशिक्षित करून त्यांच्या मनगटामध्ये सौंदर्यकार कलेने बळ दिले आहे.

अनेकांच्या  जीवनात सुख समृद्धी आणण्यासाठी सौंदर्यशास्त्राच्या माध्यमातून आपल्या कलेच्या अविष्काराने अनेकांचे जीवन समृद्ध केले आहे. कर्जतसारख्या ग्रामीण भागातून बारामती सारख्या प्रगत जिल्ह्यामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाने यशाची शिखर गाठलेल्या मुळ जन्मभुमी असलेल्या कर्जतच्या  मानसकन्येचे सर्वत्र कौतुक होत आहे. कर्जतसाठी ही एक अभिमानाची गोष्ट असून  ग्रामीण भागातील मुलीही कुठल्याही क्षेत्रामध्ये शहरातील मुलींपेक्षा सरस असल्याचे पुजा देशमुख यांनी दाखवून दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here