जामखेड न्युज——
भगवान शंकर वराट (नाना) यांचे १०२ व्या वर्षी निधन
साकत येथील भगवान शंकर वराट (नाना) (वय १०२ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी रात्री एक वाजता निधन झाले. अंत्यसंस्कार आज सकाळी दहा वाजता घराजवळ वराट मळा येथे होणार आहेत.
शंभरी पार करणारे भगवान शंकर वराट नाना नावाने परिचित होते. गावातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती होते. रात्री एक वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या मागे एक मुलगा व तीन मुली, सुन नातंवडे असा मोठा परिवार आहे.
प्रगतशील शेतकरी व युवा उद्योजक दादासाहेब वराट यांचे ते वडील होत.