जामखेड न्युज——
स्वकर्तृत्वावर ओळख निर्माण करा – प्रा. श्रीराम मुरूमकर
जीवनात शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शिक्षणातून आपली प्रगती साधता येते. त्यामुळे चांगला अभ्यास करा, आपले ध्येय निश्चित करा त्यानुसार प्रयत्न करा आपल्या कर्तुत्वाने आपले नशीब बनवा असे बहुमोल विचार इयत्ता दहावी पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांना माजी प्राचार्य श्रीराम मुरूमकर यांनी मार्गदर्शन केले.
श्री साकेश्वर विद्यालयात इयत्ता दहावी पालक शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबीराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. श्रीराम मुरूमकर होते. यावेळी प्राचार्य श्रीराम मुरूमकर, संतोष देशमुख, ज्ञानदेव मुरूमकर, रमेश वराट, गंगाराम घोडेस्वार, वंदना मुरूमकर, जनाबाई घोडेस्वार, मुख्याध्यापक दत्ता काळे, राजकुमार थोरवे, सुदाम वराट, महादेव मत्रे, अर्जुन रासकर, अशोक घोलप, त्रिंबक लोळगे, सचिन वराट, सुलभा लवुळ, विजय हराळे, अतुल दळवी, आण्णा विटकर, आश्रू सरोदे यांच्या सह सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्रीराम मुरूमकर म्हणाले की,
आपल्या प्रगतीसाठी नियमित सातत्य ठेवा, मुलांना आवडीच्या कामात गुंतवून ठेवा, आत्मविश्वास जागृत होईल यासाठी नियमितपणे सराव करा विद्यार्थी दशेत संस्काराची जी शिदोरी मिळते ती आयुष्यभर उपयोगी पडते असे सांगितले.
यावेळी संध्या घोडेस्वार, तेजश्री चोरमागे या विद्यार्थ्यांनींनी आपले मनोगत व्यक्त केले तर संतोष देशमुख, ज्ञानदेव मुरूमकर या पालकांनी मार्गदर्शन केले.
मुख्याध्यापक दत्ता काळे, राजकुमार थोरवे, महादेव मत्रे यांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुदाम वराट यांनी केले.