मनोज जरांगे यांच्या मुंबईतील उपोषणाच्या पाठिंब्यासाठी जामखेड तालुका सज्ज गावागावातून वाढता पाठिंबा

0
647

जामखेड न्युज——

मनोज जरांगे यांच्या मुंबईतील उपोषणाच्या पाठिंब्यासाठी जामखेड तालुका सज्ज

गावागावातून वाढता पाठिंबा

 


मुंबई येथे मराठा आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोज जारंगे पाटील यांचे सुरू होणारे आमरण उपोषण तसेच अंतरवाली सराटी येथून निघणाऱ्या पायी पदयात्रेत सामील होण्यासाठी जामखेड तालुक्यात मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने गावोगावी नियोजन बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दररोज सकाळी व संध्याकाळी दोन ते तीन गावांमध्ये बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे.

जामखेड तालुक्यातील मराठा सेवक प्रत्येक गावात जाऊन मुंबई येथील आमरण उपोषण संदर्भात तसेच मराठा आरक्षणाच्या फायद्या संदर्भात गावोगावी जाऊन समाजाचे प्रबोधन तसेच नियोजन या विषयी मार्गदर्शन करुन मराठा समाज बांधवांशी संवाद साधत आहेत .यामध्ये आज जवळा येथे नियोजन बैठक घेण्यात आली.

जवळा गावातील बहुसंख्येने मराठा तरुण कार्यकर्ते या नियोजन बैठकीस उपस्थित होते. सदर प्रसंगी मुंबई पदयात्रा व उपोषणा बाबतच्या नियोजनाची माहिती देण्यात आली. मुंबईला जाताना किमान 40 दिवस पुरेल अशा तयारीने आपण आपला दररोज खाण्याचा शिधा, अंथरून, पांघरून, इतर सुकामेवा आदीवस्तू घेऊन या आंदोलनात सहभागी व्हायचे आहे.

आजतोपर्यंत देवदैठण, धामणगाव, जातेगाव, तेलंगशी, घोडेगाव, पिंपळगाव आळवा गावांमधील बैठकांना उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.

जवळा येथील समाज बांधवांनी गावातून दहा वाहने निघणार असल्याचे सांगितले. आंतरवाली सराटी येथून निघणाऱ्या पायी पदयात्रेत जामखेड तालुक्यातील समाज बांधव अहमदनगर येथे सहभागी होत आहेत.

आजपर्यंत जामखेड येथे जरांगे पाटील यांची विराट सभा, राज्यात आदर्श ठरावे असे सलग 62 दिवस साखळी उपोषण, महिलांचा कॅन्डल मार्च, महिलांचा रस्ता रोको ही आंदोलने शांततेच्या व शिस्तबद्ध पद्धतीने झाली.त्याच पद्धतीने पायी पदयात्रेचे नियोजन करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here