पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी सांगितली यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली पोलीस विभागातर्फे एनसीसी मध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान

0
469

जामखेड न्युज——

पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी सांगितली यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली

पोलीस विभागातर्फे एनसीसी मध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान

जामखेड महाविद्यालय जामखेड येथील एनसीसी विभागाने सामाजिक क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल पोलीस विभागा तर्फे तीन विद्यार्थ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील बोलत होते.

आज विद्यार्थ्यांच्या मध्ये वाचन संस्कृती कमी होत चाललेली असून बरेचसे विद्यार्थी डिजिटल माध्यमांकडे आकर्षित झालेले दिसतात. जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यास , व्यायाम आणि संस्कार या त्रिसूत्री चा वापर केला तर आपण आपल्य ध्येयापर्यंत पोहोचू शकतो.


भूतकाळाचे भान,वर्तमानाचि जाण आणि भविष्याचा वेध घेताना अधिक भावनिक गुंत्यात न अडकता जीवनात मिळालेल्या संधीचे सोने करता आले पाहिजे असे प्रतिपादन श्री महेश पाटील यांनी केले. स्वसंरक्षणासाठी जाणीव व जबाबदारीने वागल्यास संकटांना सामोरे जाता येते असे ते म्हणाले.

या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. डोंगरे एम. एल यांनी आपल्या मार्गदर्शनात व्यक्त होताना म्हणाले की थोरा मोठ्याचे जन्मदिन हे संकल्प दिन म्हणून साजरे केले पाहिजे .विद्यार्थी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून या आभासी दुनियात जागताना सातत्याने वाचन, चिंतन, मनन केले तर जीवन समृद्ध करू शकतो.


सामाजिक क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल पोलीस विभागा तर्फे जामखेड महाविद्यालयातील एन.सी.सी विभागातील तीन विद्यार्थ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.


या कार्यक्रमास दि पीपल्स् एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धव देशमुख, संस्थेचे उपाध्यक्ष अरूण चिंतामणी, संस्थेचे सचिव शशिकांत देशमुख,सहसचिव दिलीप शेठ गुगळे, खजिनदार राजेश मोरे, अशोक शेठ शिंगवी सैफुल्ला खान व संस्थेचे इतर मान्यवर संचालक यांनी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास कला विभागाचे प्रमुख प्रा.फलके ए.बी., अंतर्गत गुणवत्ता कक्ष हमीचे समन्वयक प्रा. संजय गाडेकर, एन.सी. सी प्रमुख डाॅ केळकर विविध विभागांचे प्रमुख व प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग, अनेक विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रा. फलके ए.बी यांनी मानले . सूत्रसंचालन प्रा. भाकरे आर.ए यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here