ल.ना.होशिंग विद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात संपन्न. मी सावित्री बोलते एकांकिका सुप्रिया घायतडक यांनी सादर केली.

0
510

जामखेड न्युज——

ल.ना.होशिंग विद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात संपन्न.

मी सावित्री बोलते एकांकिका सुप्रिया घायतडक यांनी सादर केली.

 

आज सोमवार दि ३ जाने २०२४ रोजी ल.ना.होशिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अतिशय मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री श्रीकांत होशिंग तर कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी श्रीमती ज्योतीताई बेलेकर मॅडम बाल विकास प्रकल्प प्रमुख या होत्या.उपमुख्याध्यापक श्री बाळासाहेब पारखे,पर्यवेक्षक श्री प्रवीण गायकवाड,वरिष्ठ लिपिक श्री ईश्वर कोळी तसेच अध्यापक अध्यापिका , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वृंद उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर श्रीमती ज्योतीताई बेलेकर मॅडम यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर शाळेतील सर्व महिला अध्यापिकांचाही सन्मान करण्यात आला.


यानंतर विद्यार्थी मनोगते झाली.कुमारी वायफळकर, चि.वारे,यांची भाषणे झाली. नंतर सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.यामध्ये विद्यार्थिनींनी गीत व नाटिका सुंदर पणे सादर केल्या.

विशेष म्हणजे मी सावित्री बोलते या विषयावर विद्यालयातील अध्यापिका श्रीमती सुप्रिया घायतडक यांनी अत्युत्कृष्ट एकपात्री प्रयोग अतिशय उत्तमपणे सादर केल्यामुळे सर्व विद्यार्थी अतिशय भारावून गेले.श्रीमती घायतडतक मॅडम यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा सर्व जीवन प्रवास या एकांकीके मधून सांगितला त्यामुळे विद्यार्थी अगदी भारावून गेल्याचे दिसले.
त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती आदरणीय श्रीमती ज्योतीताई बेलेकर मॅडम यांनीही सर्व कार्यक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शाबासकी दिली. विशेष करून श्रीमती सुप्रिया घायतडक यांच्या उत्तम सादरीकरण बद्दलही कौतुकही केले.

शासनाच्या मुलींसाठीच्या विविध योजना व लेक लाडकी योजना याची संपूर्ण माहिती दिली.
विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग व सर्व महिलावर्ग व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी यांचे श्रीमती ज्योतीताई बेलेकर आपल्या मनोगत मधून कौतुक केले,अभिनंदन केले.

त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री श्रीकांत होशिंग साहेब यांनी आपल्या मनोगतामध्ये संपूर्ण कार्यक्रमाचे सुंदर नियोजन सर्व महिला शिक्षकांनी केले होते त्याबद्दल प्रथमतः सर्व महिला शिक्षकांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला अतिशय सुंदर असा कार्यक्रमाच्या नियोजनामुळे आज खऱ्या अर्थाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले त्यांच्या कार्याची,त्यांनी मुलींच्या प्रगतीसाठी केलेल्या कष्टाची आज प्रगती मुलींमधून दिसत आहे सर्व स्त्री वर्गाचा सन्मान करून बालिका दिनानिमित्त सर्व विद्यार्थिनींचे अभिनंदन केले त्याचबरोबर श्रावणी शिरसागर व समीक्षा फरांडे या दोघींनीही अतिशय सुंदर असे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांची वेशभूषा केली होती त्याबद्दल त्यांचेही कौतुक करून सर्व विद्यार्थ्यांनी असा थोर व्यक्तींचं जीवन चरित्र वाचून आपली अभ्यासात प्रगती करून समाज उपयोगी कार्य करावे असे प्राचार्य श्री श्रीकांत होशिंग यांनी आपल्या मनोगतामधून सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती संगीता दराडे,
घायतडक सुप्रिया,अल्हाट वंदना,भालेराव पूजा,बांगर स्वाती,रासकर प्रभा,फुटाणे देविका,धुमाळ सुरेखा,कारंडे रेश्मा,घाडगे व प्रियंका सुपेकर मॅडम यांनी परिश्रम घेतले.या वेळी कला अध्यापिका दराडे मॅडम यांनी सावित्रीबाई यांची उत्कृष्ट रांगोळी काढली होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल देडे,कुमारी म्हेत्रे गौरी व आतार अल्फिया यांनी केले व आभार प्रदर्शन श्रीमती देविका फुटाणे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here