जामखेड करांना वर्षभरात उजणीचे पाणी मिळेल – आमदार प्रा. राम शिंदे

0
926

जामखेड न्युज——

जामखेड करांना वर्षभरात उजणीचे पाणी मिळेल – आमदार प्रा. राम शिंदे

 

जामखेड करांनी गेल्या पाच वर्षापासून उजणीच्या पाण्याची प्रतिक्षा केली आता काम सुरू झाले आहे. वर्षभरात पाणी पुरवठा योजना पुर्ण करण्याच्या सूचना ठेकेदारांना दिलेल्या आहेत. त्यामुळे जामखेड करांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळेल असे आमदार प्रा. राम शिंदे यांनी आज जामखेड पाणीपुरवठा योजनेची पाहणी केली यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

आमदार प्रा. राम शिंदे यांनी आयटीआय जवळ उजणी धरणातून जामखेड शहराला येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेची पाहणी केली यावेळी आमदार प्रा. राम शिंदे, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, नगरसेवक अमित चिंतामणी, बिभीषण धनवडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विष्णू भोंडवे, सोमनाथ राळेभात, सोमनाथ पाचारणे, लहु शिंदे, सलीम तांबोळी, आण्णा ढवळे, अभिजीत राळेभात, प्रविण बोलभट, अर्जुन म्हेत्रे, मोहन गडदे, मोहन देवकाते, कैलास महाराज नेटके, संपत राळेभात, सलीम बागवान, जमीर सय्यद, प्रशांत शिंदे, अँड प्रविण सानप, प्रविण चोरडिया, अल्ताफ शेख, उद्धव हुलगुंडे, तुषार बोथरा, महारुद्र महारनवर, सुनील यादव, मोहन गडदे, अशोक महारनवर, संतोष गव्हाळे, बिटू मोरे यांच्या सह इगल इन्फ्रा इंडिया लिमिटेडचे मोनैश गुरूबक्स साहानी, अभियंता अनंत घोडेस्वार यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.


यावेळी बोलताना आमदार प्रा. शिंदे म्हणाले की,
जामखेड पाणीपुरवठा योजना कार्यारंभ आदेश
देवेंद्र फडणवीस यांनी जामखेड येथे महाजनादेश यात्रेत दाखवला होता. आता कामाला सुरुवात झाली आहे. पाच वर्षे पाण्याची प्रतिक्षा करावी लागली. आता वर्षभरात पाणीपुरवठा योजना पुर्ण होईल व जामखेड करांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळेल असे शिंदे यांनी सांगितले.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, विरोधकांनी
पाणीपुरवठा योजना मंजूर नसताना उद्घाटन केले होते. अडिच वर्षे फक्त भुलवाभुलवी केली. अशी टिका आमदार रोहित पवार यांचे नाव घेता केली. 

जामखेड नगरपरिषद अंतर्गत शहर व वाड्या वस्तीसाठी 189.98 कोटी रुपयांची 68 किलोमीटर पाणीपुरवठा योजना आहे. पाणीपुरवठा योजना पुर्ण करण्यासाठी मुदत दोन वर्षे आहे. तरी वर्षभरात योजना पुर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जामखेड पाणीपुरवठा योजनेत जलशुद्धीकरण केंद्र एक ठिकाणी तसेच पाच ठिकाणी टाक्या बांधण्यात येणार आहेत. विकासनगर बीडरोड, गोल्डन सिटी, जमादारवाडी, भुतवडा, लेहनेवाडी टाक्या आहेत.

चौकट

शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी तहसीलदार, भूमी अभिलेख, पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी यांचे युद्धपातळीवर जागा उपलब्ध करून देण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. महामार्गाच्या गटारा बाहेर तीन तीन मीटर जागा मोकळी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

(अभियंता अनंत घोडेस्वार) 

चौकट

आम्हाला पाणीपुरवठा योजना पुर्ण करण्याची दोन वर्षे मुदत आहे. आम्हाला जर कोठे अडथळा आला नाही तर तसेच शहरात गटाराबाहेर जागा उपलब्ध करून दिली तर आम्ही वर्षभरात पाणीपुरवठा योजना पुर्ण करू

(इगल इन्फ्रा इंडिया लिमिटेडचे डायरेक्टर मौनेश गुरूबक्स साहानी)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here