शैक्षणिक सहलीच्या बसला भीषण अपघात, एका शिक्षकाचा मृत्यू तर एक शिक्षक व काही विद्यार्थी जखमी

0
2329

जामखेड न्युज——

शैक्षणिक सहलीच्या बसला भीषण अपघात, एका शिक्षकाचा मृत्यू तर एक शिक्षक व काही विद्यार्थी जखमी

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाची सहल कोकण दर्शन करून परतीचा प्रवास करत होती. त्याच दरम्यान आज पहाटे सहाच्या सुमारास रस्त्यावर उभ्या असलेल्या टेम्पोला बसची धडक लागून हा अपघात झाला. सदरचा अपघात माळशिरस
तालुक्यातील वटपळी या ठिकाणी झाला. शिक्षक बाळकृष्ण काळे वय (50) यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर शिक्षक रमाकांत शिरसाठ व काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या शिक्षकाला व विद्यार्थ्यांना अकलूज येथील उपजिल्हा
रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


शैक्षणिक सहलीच्या बसला भीषण (Accident) अपघात झाल्याची घटना आज गुरुवार (दि. 21) पहाटे समोर आली आहे. परतत असताना माळशिरस तालुक्यातील पाटील वस्ती लगत बस व टेम्पोची धडक झाल्याने हा अपघात झाला.

यामध्ये एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला तर पाच ते सहा विद्यार्थी व काही शिक्षक जखमी झाले. बसमध्ये चालक, 2 पुरुष व 2 महिला असे एकूण 4 शिक्षक व 41 विद्यार्थी होते.

अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार अकलुज आगाराची एम एच १४ बी.टी.४७०१ ही बस इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाची शैक्षणिक सहल (Educational trip to Shri Shivaji Vidyalaya) घेऊन गेली होती.


बसमध्ये चालक, 2 पुरुष व 2 महिला असे एकूण 4 शिक्षक व 41 विद्यार्थी होते. याच प्रवासा दरम्यान आज पहाटे बस आणि टेम्पो मध्ये माळशिरस तालुक्यातील पाटील वस्ती लगत अपघात झाला.

यात एका शिक्षकाचा मृत्यू झाला तर एक शिक्षका सह काही विद्यार्थी जखमी असून जखमीला 108 सेवेच्या रुग्णवाहिकेतून अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार कामी दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here