आतीष भागवत पवार यांचे रस्ता अपघातात निधन पवार कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर, संपूर्ण मार्केट यार्ड परिसरात शोककळा

0
2489

जामखेड न्युज——

आतीष भागवत पवार यांचे रस्ता अपघातात निधन
पवार कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर, संपूर्ण मार्केट यार्ड परिसरात शोककळा

 

जामखेड येथील तरूण व्यापारी आतीष भागवत पवार (वय३२)यांचे बुधवारी रात्री बीड रोडवर क्रुझर व मोटारसायकलच्या समोरासमोर झालेली अपघातात रात्री ९.३० वाजता अपघातात निधन झाले यामुळे पवार कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे तर संपूर्ण मार्केट यार्ड परिसरात शोककळा पसरली आहे.

संपूर्ण मार्केट यार्ड परिसरात शोककळा पसरली आहे. आज गुरूवार सर्व लिलाव बंद ठेवण्यात येणार आहेत. आज सकाळी ९.०० वा.शोकाकुल वातावरणात तपनेश्वर येथील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

आतीष भागवत पवार हे बुधवारी सायंकाळी ९.०० वा. जामखेड वरून बीड रोडने मोटारसायकल वर चालले होते. तर बीड रोडने क्रुझर वेगाने जामखेड कडे येत होती. हाॅटेल शिवराजे जवळ क्रुझर व मोटारसायकल समोरासमोर जोरदार धडक झाली यात मोटारसायकल वरील आतीष भागवत पवार हे गंभीर जखमी झाले होते ताबडतोब त्यांना जामखेड येथे खाजगी दवाखान्यात दाखल केले तोपर्यंत त्यांचे निधन झाले होते. नंतर रात्री ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आले. 

बीड रोडवर घटनास्थळी ताबडतोब जामखेड पोलीस दाखल झाले त्यांनी घटनेचा पंचनामा केला तसेच क्रुझर गाडी पोलीस स्टेशनला नेली.

आतीष भागवत पवार यांच्या निधनाची वार्ता कळताच संपूर्ण जामखेड परिसरात शोककळा पसरली तसेच आज जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आज लिलाव बंद ठेवण्यात येणार आहेत.

आतीष पवार यांचे सहा महिन्यांपुर्वीच लग्न झाले होते. त्यांच्या मागे पत्नी, आई वडील तसेच चुलते व चुलत भाऊ असा मोठा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here